मुंबई / प्रतिनिधी : अग्निवीरचे प्रशिक्षण घेणार्या एका 20 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये एका हॉस्टेलमध्ये महिलेने गळ

मुंबई / प्रतिनिधी : अग्निवीरचे प्रशिक्षण घेणार्या एका 20 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये एका हॉस्टेलमध्ये महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महिला केरळची रहिवाशी असून नेव्हीचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती दोन आठवड्यापूर्वी मुंबईमध्ये आली होती.
सोमवारी सकाळी महिला आणि तिच्या प्रियकरामध्ये भांडण झाले होते. प्रियकराने स्वत:ला संपवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुढच्या दिवशी महिलेने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आत्महत्येमागे अन्य कारण आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. मालाड वेस्टमधील आएएनएस हमला बेसमधील रुममध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे. माहितीनुसार, महिलेचे प्रशिक्षण पूर्ण होत आले होते.
महिला रुममध्ये बेशुध्द अवस्थेत आढळून आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. मालवानी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी तपास सुरु केला आहे. कुटुंबीय आणि हॉस्टेलमधील मैत्रिणींची चौकशी केली जात आहे. महिलेजवळ सुसाईट नोट आढळून आली नाही.
COMMENTS