माजलगाव प्रतिनिधी - बीड जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांचे कामे चांगली असताना सुद्दा त्यांचे विरुद्द बीड जिल्हा रुग्णालयांतर्गत लोखंडी स

माजलगाव प्रतिनिधी – बीड जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांचे कामे चांगली असताना सुद्दा त्यांचे विरुद्द बीड जिल्हा रुग्णालयांतर्गत लोखंडी सावरगाव येथील वृध्दत्व उपचार व मानसिक आजार केंद्र, स्त्री रुग्णालय आणि परिचरीक प्रशिक्षण केंद्र येते. या ठिकाणी बाह्यास्त्रोतामार्फत गट क व ड संवर्गातील 80 कर्मचार्यांची पदभरती केली जाणार होती. यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र गृहविकास ग्रुपला हे कंत्राट दिले. यातील 60 लोकांना नेमणुकाही देण्यात आल्या होत्या परंतु ही भरती करताना कंत्राटदाराने जिल्ह्यातील काही पुढार्यांना हाताशी धरून आर्थिक व्यावहार केल्याचा आरोप करुन कोणतीही चौकशी न करता सरळ सरळ निलंबित केले गेले हा खुप मोठा अन्याय आहे.
एका कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन कमीत कमी चौकशी समिती नियुक्त करत दोषी आढळ्यानंतर निलंबनाची कारवाई करणे आवश्यक होते परंतु कोणतीही चौकशी न करता बेकायदेशीरपणे केलेले निलंबन रद्द करण्याची मागणी माजलगाव निर्भीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष परमेश्वर सोळुंके उपाध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड व सचिव हमीद शेख यांनी केली आहे .
COMMENTS