Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या

लातूर ः लातूरमध्ये मुलीसाठी इडिली घेऊन जातो असे म्हणून एका वडिलांनी आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली. येथील मा

भावाकडून 9 महिने बहिणीवर अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने औषध घेऊन केली आत्महत्या.
चिट्ठी लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या
इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

लातूर ः लातूरमध्ये मुलीसाठी इडिली घेऊन जातो असे म्हणून एका वडिलांनी आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली. येथील मार्केट यार्ड लगत असलेल्या मोतीनगर भागात ही घटना घडली. अभय लखन भुतडा (वय 35) असे 6 वर्षीय मुलीचा खून करून आत्महत्या करणार्‍या बापाचे नाव आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली या बाबत माहिती समजू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूतडा हे मोती नगर येथे राहतात. मार्केट यार्ड परिसरात त्याचे इडली गृह देखील आहे. घरी आल्यानंतर बापाने मुलीचा गळा बेडशीटने आवळून तिला ठार केले. यानंतर स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली.

COMMENTS