Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ता ओलांडण्यासाठी बीड शहरातील नादुरुस्त दुभाजकाचा जीवघेणा वापर

बीड प्रतिनिधी - बीड शहरातील नागरिकांना भौतिक सुविधा मिळण्यापासून नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन बीड जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तुटल

लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार ः राजू शेट्टी
या शाळेत शिक्षकच पुरवतात विद्यार्थ्यांना कॉपी l LOKNews24
ऑलिपिंकमध्ये भारताचा डबल धमाका

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील नागरिकांना भौतिक सुविधा मिळण्यापासून नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन बीड जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तुटलेल्या दुभाजकामुळे पादचारी व वाहनधारकांना जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे तुटलेले दुभाजक तात्काळ दुरुस्त करावेत.बीड
शहरातील नागरिकांना रस्ता , पाणी,लाईट स्वच्छता व अन्य सुविधा वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे बीड शहरातील नागरिकांमध्ये नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. बीड शहरातील तीन वर्षापासून नादुरुस्त असलेले दुभाजक दुरुस्त न केल्यास निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला निषेध करत नादुरुस्त दुभाजकांच्या ठिकाणी बेशरमाचे झाड लावून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरपते यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत दिला आहे. बीड शहरात गेल्या तीन वर्षापासून शिवतीर्थ ते हॉटेल ग्रँड यशोदा बार्शी रोड पर्यंत मोडून पडलेले दुभाजक (डिव्हायडर) नादुरुस्त आहेत. याकडे निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत 8 ऑगस्ट पर्यंत आपल्या स्तरावरून नादुरुस्त दुभाजक तात्काळ दुरुस्त करावेत नसता 9 ऑगस्ट 2023 रोजी क्रांतीदिनी बीड शहरातील तुटलेले दुभाजक या ठिकाणी बेशरमाचे झाड लावून निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभाग बीड आंदोलन करण्यात येईल असा इशारा मिलिंद सरपते यांनी सदर तक्रारीत दिला आहे.

COMMENTS