सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पुण्याला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या
सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पुण्याला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्याला चालू टेम्पोचा टायर निघून धडक बसल्याने मृत्यू झाला. काल महामार्ग स्टॉपवर ही घटना घडली. प्रेम महेंद्र ढमाळ (वय 21 रा. असवली, ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान या युवकाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघाताला टेम्पो चालक मधुकर जाधव हा जबाबदार असल्याने त्याच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रथमेश आबा काळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मधुकर जाधव याला ताब्यात घेतले आहे.

COMMENTS