विशाखापट्टणम प्रतिनिधी - भारतीय क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक घटना घडली. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा सुरु आहेत. त्यात ज्युनियर क्रिकेट
विशाखापट्टणम प्रतिनिधी – भारतीय क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक घटना घडली. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा सुरु आहेत. त्यात ज्युनियर क्रिकेटपासून महिलांच्या क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. याच दरम्यान एका महिला क्रिकेट संघाच्या बसला सामन्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अपघात झाला आहे. त्यात संघातील पाच सदस्यांना दुखापत झाली आहे. बडोदा सिनियर महिला क्रिकेट संघ विशाखापट्टणमध्ये सामना खेळून पुन्हा बडोद्याला जात होता. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 वर संघाच्या बसला एका लॉरीने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बसमधील 4 खेळाडू आणि मॅनेजर नीलम गुप्ता यांना दुखापत झाली. त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं.

COMMENTS