Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सप्तश्रृंगी घाटात एसटीचा भीषण अपघात

नाशिक - नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसला भीषण अपघात झाला आहे. नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्

आनंदाचा शिध्याचं अखेर ठरलं ; जिल्ह्यातील सात लाख ८२ हजार कुटुंबांना मिळणार लाभ
Aurangabad : समृद्धी महामार्गाच्या कामाचे साहित्य चोरीला | LokNews24
गुरुकुंज आश्रमाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

नाशिक – नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसला भीषण अपघात झाला आहे. नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. वणी बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 18 प्रवासी होते. सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी बसचा अपघात झाला. सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या घटनेत एक महिला जखमी असल्याचे समजते आहे. सप्तशृंगी गडावर ही बस मुक्कामी होती. सकाळी सप्तशृंगी गडावरून ती खामगाव ला निघालेली होती. गड उतरत असताना गणपती टप्प्यावरून बस खाली कोसळली असून तब्बल 400 फूट ती गेली आहे सध्या बसमध्ये जवळपास 15 ते 20 प्रवासी असल्याचे समजते आहे. तर या अपघातात एक महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनेची माहिती घेत ते सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले आहेत. या घटनेत किती लोक जखमी आहेत, किती मृत आहेत. याबाबतचा आकडा अद्याप समजू शकला नाही. मात्र बस थेट 400 फूट खाली कोसळल्याने हा मोठा अपघात असल्याचे बोलले जात आहे. सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामी ही बस होती आणि आज सकाळी पुन्हा ती खामगावकडे रवाना झाली होती, त्यावेळी हा अपघात झाला.

COMMENTS