Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 जालन्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात

अपघातात 6 जणांचा मृत्यू

जालना - जालना ते बीड मार्गावर एका बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झालाय. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी

ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू
मद्यधुंद मुख्याधिकार्‍यांनी उडवले दोन गाड्यांना

जालना – जालना ते बीड मार्गावर एका बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झालाय. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अंबड पासून 10 किमी वर हा अपघात झाला आहे. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरुन येणाऱ्या आयशर ट्रकची समोरा समोर धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून 14 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात एवढा भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

COMMENTS