Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचार्‍यांचे उपोषण

राहाता ः राहाता नगरपरिषद कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी सोमवारपासून आपल्या विविध मागण्यांसाइी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

जीवनात आनंद कमी होऊ देऊ नका ः समाधान महाराज शर्मा
अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई
साई मल्टीस्टेटने व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केले ः खा. लोखंडे

राहाता ः राहाता नगरपरिषद कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी सोमवारपासून आपल्या विविध मागण्यांसाइी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात कर्मचार्‍यांनी 20 सप्टेंबर रोजी तहसीलदार, जिल्हाधिकारी, राहाता नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना पालिकेतील कंत्राटी कामगार हे उपोषणास बसणार असल्याचे लेखी पत्र यावेळी दिले होते.
या पत्रात उपोषणास पालिकेमधील कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार, वीज विभाग, पाणीपुरवठा विभाग, अग्नीशामक विभाग, इत्यादी कर्मचारी या उपोषणात सहभागी होणार असून त्यांनी आपल्या मागण्या खालील प्रमाणे शासनाने त्वरित पूर्ण कराव्या यामध्ये पालिकेला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलेले आहे की, राहाता नगर परिषदेमधील ठेकेदार किशोर शिंदे सावित्रीबाई सुशिक्षित बेरोजगार संस्था यांचे टेंडर असून ते काळ्या यादीत समावेश करण्यात यावा. तसेच या ठेकेदाराने शासन निर्णय अधिनियम 1948 नुसार किमान वेतन,ईपीएफ भरला जात नाही,महिन्याच्या चार पगारी सुट्ट्या देण्यात यावे, कोणताही प्रकारचे साहित्य पुरविण्यात येत नाही, पगार वेळेवर केले जात नाही यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. इत्यादी मागण्या पूर्ण करण्याबाबत त्यांनी पालिके समोर धरणे आंदोलन करून उपोषणास बसले आहेत. या उपोषणाची दखल घेऊन शासनाने योग्य ती कारवाई करून या कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा. अशी मागणी उपोषणकर्त्यांनी यावेळी केलीआहे. या उपोषणास पालिकेचे मुख्य अधिकारी वैभव लोंढे, कैलास बापू सदाफळ, विजय सदाफल, राजेंद्र वाबळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांचे म्हणणे जाणून घेतले आहे. या उपोषणास मुन्ना ताई चावरे, पांडुरंग बनसोडे, अनिल थोरात, सागर कासार, संदीप सदाफळ, कृष्णा कुराडे, सचिन गाढवे, प्रफुल्ल निकाळे, प्रवीण रणवरे, अमोल बनकर, वैभव लहारे, गोरक्ष साळवे, दीपक आरणे, सिद्धांत थोरात,विनोद सोनवणे, नगमा शेख, ज्योती खंदारे, प्रीती जाधव, गायत्री आव्हाड, सुनिता निकाळे, छाया कांबळे, मंगल निकाळे, वंदना कुराडे, मीना अहिरे, जयश्री सोनवणे, सविता निकाळे, मीना माळी, वैशाली निकाळे आदि कर्मचारी यावेळी उपोषणास स्थळी उपस्थित होते..

COMMENTS