Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जल जीवन मिशन योजनेसाठी आमरण उपोषण

गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे

श्रीगोंदा :  हर घर जल अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील 79 गावांसाठी केंद्र सरकारची जल जीवन मिशन पाणी योजना मंजूर आहे. यापैकी फक्त 13 गावांची पाणी यो

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला 12 वर्षांनी आरोपीला शिक्षा | LOKNews24
कोपरगावमध्ये एकल महिलांचा फॅशन शो उत्साहात
टाकळी कडेवळीत सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन वाळुंज

श्रीगोंदा :  हर घर जल अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील 79 गावांसाठी केंद्र सरकारची जल जीवन मिशन पाणी योजना मंजूर आहे. यापैकी फक्त 13 गावांची पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु इतर गावांची योजना का रखडली आहेत इतर गावातील महिला व नागरिकांना या योजनेपासून अधिकारी व ठेकेदारांनी मनमानी करत दिलेल्या वेळेत पाणी योजना पूर्ण न केल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे हे पंचायत समिती श्रीगोंदा येथे कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.
             पाणी योजनेचा कार्यारंभ आदेशातील अटी शर्तीनुसार विहीत वेळेत पुर्ण होणे बंधनकारक असताना संबंधीत अधिका-यांनी ठेकेदारांना पाठीशी घालत पाण्यापासून गावातील नागरिकांना वंचित ठेवल्यामुळे असे अधिकारी यांना निलंबीत करावे. विलंब करणारे ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचा ठेका रद्द करावा. गावांना वेळेत हक्काचे पाणी मिळावे. अशा अनेक मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण करण्यात आले होते.
             गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी मध्यस्थी करत संपुर्ण पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येतील. चांभुर्डी गावातील पाणी योजना 45 दिवसात पुर्ण करण्यात येईल. तसेच कामे पुर्ण करण्यासाठी येणा-या गाव पातळीवरील अडचणी लेखी स्वरुपात देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी वरील आशयाचे पत्र दिल्याने त्यांचे हस्ते ज्युस देऊन उपोषण मागे घेण्यात आले.

COMMENTS