मुंबई :राज्यात महायुतीच्या सरकारने विकासकामांना गती दिली आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकर्यांना पूर्णपणे कर्जमाफी देणार असल्याची घोषणाच

मुंबई :राज्यात महायुतीच्या सरकारने विकासकामांना गती दिली आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकर्यांना पूर्णपणे कर्जमाफी देणार असल्याची घोषणाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणू येथील सभेत मंगळवारी दिली. यावेळी त्यांनी डहाणूच्या विकासाबाबतही भाष्य केले. वाढवण बंदरामुळे भूमिपुत्रांना रोजगार मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच डहाणूचा विकास करताना नैसर्गिक संपदा आणि जैवविविधतेवर गदा येणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.वाढवणच्या बंदरामुळे डहाणू भागाचे चित्र बदलेल. मासेमारी करणारे कोळी बांधवांवर कोणताही अन्याय होणार नाही. पण आहे त्यापेक्षा चांगली अवस्था आम्ही तुम्हाला आणून देऊ. हा देवाभाऊचा शब्द आहे. तुमच्या पारंपारिक व्यवसायाला नवी उंची कशी मिळेल. याची योजना आम्ही आखली आहे. त्यामुळे पुढील काळात कोळी बांधव समृद्ध झालेले पहायला मिळतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते डहाणू येथे प्रचार सभेत बोलत होते.
COMMENTS