Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांनी केली पेरणीची सुरूवात

अंबाजोगाई प्रतिनिधी - दरवर्षी जून महिन्यातच पेरण्या होत असतात पण यंदा मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. पण दोन दिवसापुर्वी पेरण्या योग

टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
देवस्थान ईनाम जमिनी खालसा करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सांगलीत मोर्चा
राजमाची येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवनदान

अंबाजोगाई प्रतिनिधी – दरवर्षी जून महिन्यातच पेरण्या होत असतात पण यंदा मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. पण दोन दिवसापुर्वी पेरण्या योग्य पाऊस झाल्यामुळे तालुक्यात पेरणीला सुरूवात झालेली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाबाबत शेतकरी वर्गास दिलासा मिळाला असून सोयाबीन,  तूर, मका या खरीप पिकांची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. दोन दिवसांत अंबाजोगाई तालुक्यात पेरणी योग़्य पाऊस झाला असून झालेला पाऊस हा भीज स्वरुपाचा असल्याने जि नीत पेरणीयोग्य ओल झाली आहे. खरीप हंगामातील पेरण्यांना उशीर झाला असला तरी शेतकरी वर्ग सोयाबीन, उडीद, मका, आणि तुरीच्या पेरण्या करत आहेत. कमी कालावधीत आणि रब्बी हंगामातील दुसरे पीक घेता येणे शक्य असलेल्या सोयाबीन पिकास शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहेत. तर ज्यांच्याकडे पशुधन आहे, असा शेतकरी मका किंवा तत्सम वैरणीच्या पिकास प्राधान्य देताना दिसतो आहे. पावसाअभावी अंबाजोगाई तालुक्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. पण गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या अपेक्षा वाढीस लागल्या आहेत.

COMMENTS