Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडेच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी आंदोलनात घेतली उडी

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या निर्मितीला 53 वर्ष झाली. याधरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याची कामे राज्यकर्त्यां

सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
ओव्हरलोड वाहनावर कडक कारवाई करणार्‍या महिला उप प्रादेशिक अधिकार्‍यास दमदाटी
अलिबागच्या क्रूझ पार्टीत झाला त्याला इन्फ्लूएंझा व कोविड संसर्ग

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या निर्मितीला 53 वर्ष झाली. याधरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याची कामे राज्यकर्त्यांच्या उदानसीतामुळे पूर्ण होत नाही. उजव्या व डाव्या कालव्यांची कामे जलद गतीने पुर्ण करून शेतकर्‍यांना पाणी मिळावे यासाठी तांभेरे गावातील राम मंदिरात निळवंडी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी उपोषण सुरू केले आहे.
निळवंडे धरणावरील लाभ श्रेञातील  182 गावांचे पिण्याचे पाणी आरक्षित करावे. प्रस्तावित कालव्यांमध्ये वन विभागाच्या येणार्‍या अडचणी दुर कराव्यात, डाव्या आणि उजव्या कालवे हे बंदिस्त ऐवजी उघड्या पद्धतीने कराव्यात अशी मागणी या उपोषणकर्तांनी केली आहे.निळवंडेच्या आंदोलनात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील  उडी घेतली असून उपोषणकर्त्यांची दखल घेतली नाही. तर स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे. या आंदोलनात निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर वर्पे, डॉ. सुधाकर मुसमाडे, नितीन गागरे, राधाजी राऊत, सचिन मुसमाडे, गणेश मुसमाडे, बाबासाहेब पठारे, भगीरथ नरोडे, जयराम गिते, राजेंद्र नालकर, अशोक जोशी, मारुती कदम, अनिल राऊत, नितीन नरोडे, सोमनाथ नरोडे, शिवाजी पठारे, तुषार पठारे, अशोक पठारे, आबा पानसंबळ, दीपक गिताराम कोते, बापुसाहेब चोथे, दीपक वैरागर, सार्थक पठारे आदी सहभागी झाले होते.

COMMENTS