देवळाली प्रवरा प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने चोर्यांचे प्रमाण वाढत चालल्याने पोलिसांनी ह्याची गंभीर दखल घेऊन त्वरित न्
देवळाली प्रवरा प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने चोर्यांचे प्रमाण वाढत चालल्याने पोलिसांनी ह्याची गंभीर दखल घेऊन त्वरित न्याय न दिल्यास पोलीस खात्या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा उंबरे येथील शेतकर्यांनी आपल्या व्यथा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समोर मांडल्या त्यावेळी हा इशारा दिला. उंबरे ब्राह्मणीसह चार गावातील शेतकर्यांच्या विहिरीतील मुळा उजवा कालव्यावरून 100 च्या आसपास विद्युत मोटारी केबल चोर्या झाल्या आहेत. तालुक्यातील उंबरे, ब्राह्मणी, मोकळ ओव्हळ, चेडगाव ह्या गावातील शेतकर्यांच्या 100 च्या वर विद्युत मोटार, केबल स्टार्टर, चाप कटर, जनरेटरच्या चोर्या होऊनही त्याचा अद्याप तपास न लागल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी उंबरे येथे आज आपल्या व्यथा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समोर मांडल्या.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यावेळी म्हणाले कि, गुन्हेगारांवर पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसून पोलिसांच्या संगनमताने अश्या घटना घडत आहे. तालुक्यात पोलिसांची संख्या अपुरी आहे. गावे 96 तर अवघे 40 पोलीस आहेत. पेट्रोलिंगसाठी स्वतंत्र गाडी नाही. अश्या अनेक समस्या जरी असल्या तरी पोलिसांनी लक्ष देऊन तपास लावला पाहिजे. उंबरे चेडगाव मोकळ ओव्हळ, ब्राह्मणी परिसरातील शेतकर्यांच्या 100 च्या वर पाण्यातील विहिरीतील विद्युत मोटारी केबल चोरी झाल्या अनेक शेतकर्यांचे चाप कटर, जनरेटर मोटार सायकल चोरी झाल्यात. याचा तपास लागावा, त्यासाठी पोलिसांनी विनंती करणार नाही. शेतकरी आधीच आर्थिक नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडला आहे. त्यात अतिवृष्टीची मदत देण्याबाबत शासन पालकमंत्री तारखेवर तारखा देत आहे. पण ती मदत अद्याप मिळत नाही. मदत मिळण्यासाठी उपस्थित डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांनी आपल्या पाहुण्याकडे आग्रह धरावा असे सांगितले.
अश्या घटना गेल्या अनेक महिन्यापासून विशेषतः नदी पात्रातील वाळू मुरूम वाहतूकीस बंदी आल्यापासून हे प्रकार वाढत चालले आहे. बेकायदा वाळू मुरूम वाहतूक बंद झाल्याने त्यांचे धंदे बंद झाल्याने ही मंडळी ह्या चोर्या मार्या करण्याकडे वळले आहे. ही मंडळी व्यसनाधीन असल्याने चोर्या करण्या शिवाय दुसरा पर्याय न राहिल्याने हे प्रकार गेल्या चार ते पाच महिन्यापासून वाढले आहे. याबाबत पोलिसांनी शेतकर्यांना लवकरात लवकर न्याय न दिल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता राहुरी सोनई रस्ता रोको केला जाईल. यात सर्व पक्ष गट तट सहभागी होऊन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुनील अडसूरे ह्यांनी दिला. या बैठकीत अप्पासाहेब ढोकणे, भाऊराव ढोकणे, कुंडलिक ढोकणे, मच्छिन्द्र ढोकणे, उत्तमराव ढोकणे, गंगाधर अडसूरे, भाऊ सातवडे, दिपक ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, बाळासाहेब हापसे, सरपंच सुरेश साबळे, बाबुराव ढोकणे गोपाळा कडू, विजय माळवदे ह्यांनी सहभागी होऊन आपल्या तक्रारीचा पाढा वाचला.
COMMENTS