विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढले

आठ दिवसांत 16 शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या

नागपूर/प्रतिनिधी : विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा नेहमीच चढताच राहिला आहे. शेतकरी आत्महत्येचे कारणे देखील तसेच विशेष आहेत. विदर्भात शेतजम

चारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेची आत्महत्या
पत्नीसह मुलाची हत्येनंतर शिक्षकाची आत्महत्या
सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीच्या मुलीने आत्महत्या केली

नागपूर/प्रतिनिधी : विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा नेहमीच चढताच राहिला आहे. शेतकरी आत्महत्येचे कारणे देखील तसेच विशेष आहेत. विदर्भात शेतजमीन मोठी असली तरी सिंचनाच्या अपुर्‍या सोयी, त्याचबरोबर बी-बियाण्यांतील मोठी फसवणूक आणि यंदा झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. विदर्भात गेल्या आठ दिवसांत तब्ल 16 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या 16 आत्महत्येपैकी 6 आत्महत्या या अवघ्या दोन दिवसांत यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात झाल्याचा खळबळजनक दावा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. तिवारी यांनी मारेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. विदर्भात गेल्या वर्षभरात एक हजार 32 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेती स्वावलंबन मिशनने पंचसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. सरकारने हा कार्यक्रम तातडीने राबवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात पहिल्या आठ महिन्यात विक्रमी एक हजार 32 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहे. आजपर्यंत सर्वाधिक एक हजार 231 आत्महत्या आत्महत्या 2006 मध्ये झाल्या होत्या. 2022 मध्ये हा आकडा प्रचंड वाढला आहे. सततची अतिवृष्टी, नापिकी, उत्पादनात झालेली घट व प्रशासकीय उदासीनता, प्रचंड भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे तिवारी म्हणाले. 2 सप्टेंबरला यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यात म्हैसदोडका, नरसाळा, रामेश्‍वर, गदाजी बोरी येथे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना भेट दिली असता या घरापर्यंत प्रशासन, पोलीस, कृषी, ग्रामविकास, आरोग्य आदी एकाही विभागाचा अधिकारी पोहचला नव्हता. यावरून शेतकरी आत्महत्याविषयी अधिकारी किती उदासीन आहेत, हे दिसते, अशी खंत तिवारी यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार, असे वचन दिले आहे. त्यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी ‘पंचसूत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम’ शेतकरी मिशनचा अध्यक्ष म्हणून सरकारला सादर केला, असे तिवारी यांनी सांगितले.

COMMENTS