Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

वर्धा/प्रतिनिधी ः संपूर्ण राज्यात बैल पोळ्याचा सण उत्सवात साजरा करण्यात येत असतांना वर्धा जिल्ह्यात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा

महसूल विभागाने वाळूसह जप्त केलेले वाहन लंपास
लातूर येथे गोदामात पार्किंगला लावलेल्या टेम्पोची चोरी
तोतया एसीबीच्या टीमचा छापा; निवृत्त अधिकार्‍याच्या घरी सिनेस्टाईलने लाखो लुटले

वर्धा/प्रतिनिधी ः संपूर्ण राज्यात बैल पोळ्याचा सण उत्सवात साजरा करण्यात येत असतांना वर्धा जिल्ह्यात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिवरा परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.  या घटनेने गुंजखेडा गावावर शोककळा पसरली आहे. राजू पुंडलिक राऊत (53), चंद्रकांत राजू राऊत अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी राजू राऊत यांचे शेत हिवरा शिवारात आहे. यामुळे राजू व त्यांचा मुलगा चंद्रकांत हे दोघेही जवळील तलावातील पाण्यात बैलांना धुण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी बैल धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात गटांगळ्या घेत बुडाले. यामध्ये दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावात शोकमग्न वातावरण होते. या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली.

COMMENTS