Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप

जामखेडमध्ये आमदार प्रा. राम शिंदे, रोहित पवारांनी लुटला नाचण्याचा आनंद

जामखेड ः जामखेड शहरासह तालुक्यातील गणेश मंडळांनी ढोल, ताशा, लेझीम, फड, ढोलीबाजा, बेन्जोबाजा सवाद्यात मिरवणूक काढून जल्लोषात गणेशाचे विसर्जन उत्सा

कोल्हे यांनी जखमी युवकाला केली मदत
 मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 75 रुग्णांनी घेतला लाभ
आता कट्टा…अडीच वर्षांचे उट्टे फेडणार?

जामखेड ः जामखेड शहरासह तालुक्यातील गणेश मंडळांनी ढोल, ताशा, लेझीम, फड, ढोलीबाजा, बेन्जोबाजा सवाद्यात मिरवणूक काढून जल्लोषात गणेशाचे विसर्जन उत्साहाच्या वातावरणात केले. दहाव्या दिवशी शहरातील 14 व ग्रामीण भागातील 17 मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभात घेतला होता . विसर्जन मिरवणूक तब्बल 8 तास चालली.
शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री 12.5 मिनिटांनी झाले. प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. बालगणेश मंडळानी सकाळीच चारचाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या. तर दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते. सर्व रस्ते परिसर गूलालमय झाला होता. मिरवणूका पहाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. गल्लोगल्लीतील, चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीतून मिरवणूक काढण्यात आल्या. सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघाले होते. भगव्या टोप्या, पट्ट्या, डोक्यावर मिरवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण दिसत होते. दरवर्षीप्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी व मित्र मंडळाने गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार आमदार राम शिंदे प्रा मधुकर राळेभात, सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वर्षी आमदार रोहित पवार यांनी मेनरोड वर भव्य स्टेज उभारून सर्व गणेश मंडळांचे  सत्कार आ रोहित पवार यांनी स्वतः केले. अनेक वेळा संघर्ष मित्र मंडळाने गणेश उत्सव काळात प्रथम क्रमांकाचे पारितोषीक घेतले आहेत. या वर्षी मंडळाची पहिल्या दिवशाची आरती आ. राम शिंदे यांनी केली तर विसर्जन मिरवणुकीची आरती आ. रोहित पवार यांनी केली. जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आ. रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी गाण्याच्या तालावर गणेश मंडळांबरोबर व कार्यकर्त्यांबरोबर गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद घेतला. यावेळी शहरासह ग्रामीण भागात कोठेही  कोणताही अनुचित प्रकार घडला नाही संपुर्ण दहा दिवस भक्तीमय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विशेष म्हणजे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता त्यामुळे गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत व उत्साहात पार पडला. 

COMMENTS