Homeताज्या बातम्याविदेश

प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा मृत्यू

210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न जीवावर बेतला

बाली/वृत्तसंस्था : इंडोनेशियामध्ये 33 वर्षीय प्रसिद्ध फिटनेस ट्रेनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फिटनेस ट्रेनर जस्टिन विकी बारबेल उचलण्याचा प्रयत्न

कोंबड्या पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड… पहा व्हिडिओ…
सुषमा अंधारे आमदार शिरसाटांवर ठोकणार तीन रूपयांचा दावा
जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर,उद्धवजी वर चिखलफेक करू नका.

बाली/वृत्तसंस्था : इंडोनेशियामध्ये 33 वर्षीय प्रसिद्ध फिटनेस ट्रेनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फिटनेस ट्रेनर जस्टिन विकी बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मान मोडल्याने त्याचा मृत्यू झाला. 15 जुलै रोजी हा अपघात झाला.  जस्टिन विकी इंडोनेशियातील बाली येथील जिममध्ये व्यायाम करत होता, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे.
फिटनेस इन्फ्लुएंसर जस्टिन विकी 210 किलो वजनी बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना तो त्याच्यावर अंगावर पडला आणि त्याची मान मोडली. या अपघाताशी संबंधित एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जस्टिन विकी खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 33 वर्षीय जस्टिन विकी फिटनेस इन्फ्लुएंसर म्हणून काम करत होता. जस्टिन फक्त फिटनेस तज्ज्ञ नाही, तर तो अनेकांसाठी प्रेरणास्थान होता. अनेक जणांचा तो फिटनेस गुरु होता. जस्टिन विकी पॅराडाईज बाली जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना दिसत आहे. स्क्वॅटमध्ये गेल्यानंतर तो सरळ उभा राहू शकत नाही असे दिसते. जस्टिन विकी 210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना त्याच्या तोल गेला आणि बारबेलचं वजन मानेवर पडलं आणि तो बसलेल्या स्थितीतच खाली पडला. बारबेलचे वजन मानेवर पडल्याने त्याची मान मोडली. जस्टिन विकीच्या स्पॉटरने त्याचा तोल गमावल्याचे दिसते आणि घटनेदरम्यान तो त्याच्यासोबत मागे पडताना दिसतो. जस्टिन वेटलिफ्टिंग करत असताना त्याला मागच्या बाजूने वजन उचलण्यास मदत करायला व्यक्ती होती. पण, काही कळण्याच्या आतच हा सर्व प्रकार घडला. अपघातामुळे त्याची मान तुटली आणि त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांना जोडणार्‍या महत्वाच्या मज्जातंतूंना गंभीर दुखापत झाली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

COMMENTS