Homeताज्या बातम्यामनोरंजन

सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन

मुंबई प्रतिनिधी - अभिनेते अनुपम खेर यांनी आज ९ मार्च रोजी गुरुवारी पहाटे सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. ६६ वर्ष

आनंद चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : लाखाची बक्षिसे
महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना : डॉ. भारती पवार | LOKNews24
कोपरगावात गीत गायन स्पर्धा उत्साहात

मुंबई प्रतिनिधी – अभिनेते अनुपम खेर यांनी आज ९ मार्च रोजी गुरुवारी पहाटे सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. ६६ वर्षीय सतीश कौशिक यांनी बुधवारी रात्री ८ मार्च रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आता सतीश यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. सतीश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे आणि त्यावेळी ते दिल्ली, एनसीआरमध्ये होते. त्यांचा मृतदेह गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंबईला आणण्यात येईल. सतीश कौशिक यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरातील चाहते आणि इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

COMMENTS