महाराष्ट्र हे देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगत राज्य मानले जाते. किंबहुना, ते खूप आधीपासूनच प्रगत पथावरचे राज्य आहे. त्यामुळेच,
महाराष्ट्र हे देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगत राज्य मानले जाते. किंबहुना, ते खूप आधीपासूनच प्रगत पथावरचे राज्य आहे. त्यामुळेच, उत्तर भारतातील अनेक लोक रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात दाखल होतात. महाराष्ट्राची महानगरेच नव्हे, तर, जिल्हा, तालुका स्तरावरची शहरे आणि प्रत्यक्ष खेडेगाव, या सर्व ठिकाणी आता उत्तर भारतीयांचा डेरा जमलेला आहे. काही ठिकाणी पाणीपुरीचे व्यवसाय, तर, काही ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय करत, ते आपला जम बसवतात. परंतु, यातील जे वरच्या जात समूहाचे लोक आहेत, ते प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, कल्याण अशा महानगरांमध्ये एकवटले. त्यांनी अनेक मोठे व्यवसाय ही थाटले. उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी, ज्या महानगरांमध्ये निर्माण होत आहेत, त्या सोसायटींमध्ये मालकी हक्काने राहणारे आणि भाडे तत्त्वावर राहणारे यांच्या यादीवर जर नजर फिरवली, तर, मालकी हक्क बहुतांश गैरमराठी म्हणजे परप्रांतीयांच्या नावेच या सोसायटी झालेल्या दिसतात! त्यामध्ये प्रत्येक प्रांताचे उच्च जातीय त्या सोसायट्यांमध्ये आहेत. त्यामुळे, मराठी माणसाला त्या ठिकाणी घर मिळू नये, यासाठीही ते एक गट तयार करतात. त्याचबरोबर शाकाहारी-मांसाहारी असा भेद निर्माण करून मराठी माणसांना घरही नाकारतात. हा वाद अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू आहे. परंतु ढेपाळलेल्या राजकीय सत्ताधाऱ्यांना या संदर्भात कारवाई करायला तितकसं जमत नाही. परंतु, काल कल्याण येथे का उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या मारहाण प्रकरणी, शुक्ला नावाच्या एका तथाकथित बनावट अधिकाऱ्याला आता पकडण्यात आले आहे. त्याला सेवेतून निलंबितही करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही माजोर्ड्या व्यक्तीला की, जो मराठी माणसावर हल्ला करण्याची हिम्मत करतो, त्याला माफ केलं जाणार नाही; अशा भाषेत विधानसभा सभागृहात ठणकावून सांगितले. याचा अर्थ महाराष्ट्राच्या मराठी माणसांवर ज्या प्रकारे परप्रांतीयनी हल्ला चढवला आहे, तोही साधा नव्हे तर भाडोत्री गुंडांना बोलवून, हा हल्ला चढावला गेला आहे. त्यामुळे हा हल्ला करणारा शुक्ला याला मोक्का सारखा कायदा लावण्याची गरज आहे. कारण, ज्या पद्धतीने त्याने सोसायटीत गुडांना घुसवल्याचे व्हिडिओ दिसतात; ते पाहता तो संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे, हे स्पष्ट दिसतं. खाजगी मालकीच्या गाडीवर आयएएस अधिकाऱ्याचा दिवा लावून फिरणारा हा भामटा शुक्ला, गेली कित्येक वर्ष ना मंत्रालयाच्या लक्षात येतोय, ना पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात येतोय, याचा अर्थ त्याचे हात बरेच लांब दिसतात. त्यामुळे त्याला मिळणारी वागणूक ही व्हीआयपी दिसते. पोलीस लवकर गुन्हा दाखल करून घेत नाही, याच्यावरून हे कळतं की, तो बराच व्हीआयपी सारखा वागवला जातो आहे. परंतु, ज्या पद्धतीने त्याने मराठी माणसांवर हल्ला चढवला आहे, ते पाहता त्याच्यावर अशा प्रकारची कारवाई करायला हवी की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला हे वाटेल की, हे सरकार मराठी भाषिक आहे! हे सरकार आपलं महाराष्ट्रीयन सरकार असल्याचं वस्तुनिष्ठ पुरावे आहेत. हे माणसाला वाटलं पाहिजे. वाटायला हवं. हा विश्वास निर्माण करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये निश्चित केले आहे. परंतु, शुक्ला या गुंडसारख्या प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी त्याच्या विरोधात खटला नोंदवण्यास दिरंगाई का केली, याचा जाबही पोलिसांना विचारला पाहिजे. तो खटला दाखल न करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई व्हायला हवी. कारण, अशा प्रकारची मुजोरी महाराष्ट्रात येऊन, परप्रांतीय करत असतील तर, महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती सुरक्षित नाही, असा त्याचा अर्थ होईल! त्यामुळे, हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणाने घेतले आहे. परंतु, प्रशासनातल्या लोकांनीही त्या विरोधात तितकीच गंभीरपणे कारवाई करायला हवी. याची मराठी माणूस वाट पाहिल. शुक्लाला धडा शिकवल्यानंतर मराठी माणसाला एक संदेश निश्चितपणे जाईल. इतर परप्रांतीयांनाही त्या प्रकरणावरून निश्चितपणे काही धडा मिळेल, ही खबरदारी शासन आणि प्रशासन यांनी घ्यावी.
COMMENTS