Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अगोदर सुविधा द्या, मगच वसुलीची मोहीम राबवा

नागरिकांची कोपरगाव नगरपालिकेकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपालिका थकबाकी वसुलीसाठी  सज्ज झाली आहे पालिकेने विविध कामगारांसह अधिकार्‍यांचे पथके  तयार करून  वसुली मोहिम कडक कर

नगरपरिषदेने फंडातून एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी ;उपनगराध्यक्ष, भाजप, शिवसेना नगरसेवकांची मागणी
टायर फुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू
राहाता नगरपरिषदेस 14 कोटी निधी मंजूर

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपालिका थकबाकी वसुलीसाठी  सज्ज झाली आहे पालिकेने विविध कामगारांसह अधिकार्‍यांचे पथके  तयार करून  वसुली मोहिम कडक करण्यात आली आहे मात्र गेल्या दीड वर्षापासून पालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. यात अनेक कामे सध्या ठप्प झालेली आहे. नगरपालिका ही नागरिकांना सुविधा देणारी संस्था असते मात्र कोपरगाव नगरपालिका आज पर्यंत नागरिकांना दररोज पाणीपुरवठा अन्यथा इतर सुविधा देण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नगरपालिकेने अगोदर सर्व सुविधा द्याव्या मगच वसुलीची मोहीम व्यापकपणे राबवावी असी मागणी नागरिकांनी केली  आहे.
नागरिकांवर कर भरण्यासाठी सक्तीची मोहीम राबवली जाते अन्यथा त्यांच्यावर कारवाई नळ कनेक्शन कट करणे आधी स्वरूपाची कारवाई करण्यात येते कित्येक विकासात्मक प्रश्‍न राजकीय संघर्षामुळे व प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ठप्प आहे. पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी हेदेखील अनेक सुविधा देण्यास फारसे यशस्वी झाले नाहीत केवळ आलेली वेळ सावरून घ्यायचे तसेच इतर नागरिक अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रश्‍नांना तसेच नागरिक सुविधा संदर्भात तक्रारींवर पालिका प्रशासक कुठलीही ठोस भूमिका अथवा त्यावर उपाय योजना करण्यात अयशस्वी झाली आहे. यातच आता कर बाकी भरण्यासाठी पालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. करवाढ संदर्भात देखील पालिकेने काही दिवसांपूर्वी नेमलेल्या  एजन्सीकडून  झालेल्या सर्वे मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या हे असताना देखील सर्वे करणार्‍या कंपनीवर पालिका प्रशासनाने काय कारवाई केली हे देखील आजपर्यंत गुलदस्त्यातच राहिले. आहे. एकीकडे नगरपालिका जनतेकडून 365 दिवसांची पाणीपट्टी घेऊन केवळ वर्षभरामध्ये 60 ते 65 दिवस पाणी देते आणि कर मात्र पूर्ण दिवसांचा घेते कर न  भरल्यास त्याला शास्ती लावली जाते त्यात करदात्यांना कुठल्याही प्रकारची सूट दिली जात नाही मग हा अन्याय करदात्यांवर का? याला जबाबदार कोण? याची सोडवणूक करण्यास पालिका प्रशासन वर्षानुवर्ष अपयशी ठरली आहे. तसेच पालिकेने अगोदर नागरिकांना योग्य सुविधा तसेच दररोज स्वच्छ पाणी द्यावे. तसेच अनेक वर्षांपासून नगरपालिकेने विस्थापितांसाठी  संकुले बांधून देखील त्याचे आजपर्यंत सर्वसामान्य छोट्या व्यवसायिकांना वाटप झाले नाही, अतिक्रमण मात्र नगरपालिकेने मोठ्या दिमाखात काढले होते. त्यांचे पुनर्वसन करण्यास देखील नगर पालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे नगरपालिकेने अगोदर सर्व सुविधा द्याव्या मगच वसुलीची मोहीम व्यापकपणे राबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे अन्यथा येणार्‍या काळामध्ये पालिका प्रशासना विरोधात मोठा असंतोष पसरून पर्यायाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास ह्याचे नवल नको, त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार नगरपालिका प्रशासनाने करावा.

COMMENTS