Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय परिषदेतून तंत्रज्ञानाच्या माहितीचा विस्तार ः डॉ. गुल्हाने

लोणी ः देशातील विविध भागातील विद्यार्थ्याना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण घेवाण होणार आहे. तसेच प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्या

सारडा महाविद्यालयाच्या ९ छात्रांची अग्निवीर मधून भारतीय सैन्यात निवड
अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण
नगरसह दहा जिल्हे उद्यापासून निर्बंधमुक्त ; सर्व व्यवहार खुले

लोणी ः देशातील विविध भागातील विद्यार्थ्याना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण घेवाण होणार आहे. तसेच प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. त्यामुळे महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानंतर पुढील करियरसाठी मोठी मद्दत होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले.
       लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान  इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी इंजिनीरिंग विभागातर्फे  पीआरईसीकोन 2024  या अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत डॉ.गुल्हाने बोलत होते.या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी सह सचिव भारत घोगरे पाटील, आई. ई. टी. ई. नवी दिल्ली संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए.के. सैनी,उपाध्यक्ष डॉ.अजय ठाकरे,आई. ई. टी. ई.चे डॉ. निलेश कासट आई. ई. टी. ई. झोनल मॅनेजर (वेस्ट) आणि माजी विद्यार्थी श्री निलेश नाईक, टेक्निकल प्रोग्रॅम मॅनेजर ग्रे ऑरेंज पुणेचे अशोक पोमनार,तंञनिकेतनचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सैनी यांनी या उपक्रमचे विशेष कौतुक केले व औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व त्यामध्ये सातत्याने होणारे बदल हा शैक्षणिक अभ्यासक्रमात उपयुक्त होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.  शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांसाठी प्रवरा रुरल इंजिनीरिंग कॉलेज अशा पद्धतीने करत असलेल्या नियोजना बद्दल समाधान व्यक्त केले. परिषदेसाठी विविध राज्यांमधून अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रातील विविध शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये एकून 200 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.  परिषदेचे संयोजिका डॉ.सीमा लव्हाटे यांनी प्रास्ताविक केले.परिषद यशस्वीतेसाठी डॉ. मिनिनाथ बेंद्रे,  डॉ. सचिन कोरडे, डॉ. शकील शेख, प्रा. राजेश भामरे,प्रा. संजय जोंधळे , प्रा. दिनेश घोरपडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार डॉ.निर्मळ यांनी मानले.

COMMENTS