Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये भाजपच्या 12 बंडखोरांची हकालपट्टी

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने आपल्या 12 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षातील या 12 विद्यमान आमदारांना निव

अमृतवाहिनी आयटीआयच्या 256 विद्यार्थ्यांना नोकरी
संसदीय लोकशाही गांभीर्याने चालवा !
अमृतवाहिनीतील 40 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने आपल्या 12 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षातील या 12 विद्यमान आमदारांना निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे पक्षशिस्त भंग केल्या प्रकरणी या सर्व बंडखोरांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक आठवडा शिल्लक आहे. निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे त्यात नवे नवे ट्विस्ट समोर येत आहेत. राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या 12 नेत्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी या प्रकरणी सांगितले की, पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आमदारांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ज्या आमदारांवर कारवाई करण्यात आली त्यात दिनूभाई पटेल, मधुभाई श्रीवास्तव, कुलदीप सिंग, बी पागी, धवल सिंग झाला, रामसिंग ठाकोर, मानवजीभाई देसाई, एल ठाकोर, एसएम बंत, जेपी पटेल रमेश झाला आणि अमरशी भाई झाला यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या 42 आमदारांचे तिकीट नाकारले आहे. भाजपने 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत 38 विद्यमान आमदारांना तिकीट मिळालेले नाही. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, पाटील यांच्यासह पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी आगामी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

COMMENTS