Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ केंद्र व राज्य सरकारने उठवावी अन्यथा शेतकऱ्याच्या रोशाला सामोरे जाण्याची ताकद ठेवावी- करण गायकर 

नाशिक प्रतिनिधी - छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हा संघटक गोरख संत यांच्या समर्थनात आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या वतीने लिला

जगभरातील करोडो लोकांचे उद्धार करते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या समाजाला प्रेरणादायी – करण गायकर
छावा क्रांतिवीर सेनेमध्ये संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुणांचा प्रवेश 
नाफेड व एन सी सी एफ माध्यमातून चालू असलेली शेतकऱ्यांची फसवणूक त्वरित थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी- करण गायकर

नाशिक प्रतिनिधी – छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हा संघटक गोरख संत यांच्या समर्थनात आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या वतीने लिलाव बंद करण्यात आले.शेतकरी आंदोलन पुत्राच्या तब्येतीस थोडेही काही झाले तर याची जबाबदारी शासन प्रशासनाची असेल याची दखल घ्यावी.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून शेतकरी पुत्र गोरख संत हे आमरण उपोषण करत असून शासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज छावा क्रांतिवीर सेना व संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सुरू असलेले लिलाव बंद पाडून बाजार समितीच्या गेटवर बाजार समिती मध्ये सुरू असलेले लिलाव बंद करून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवकाळी पाऊस व कोरडा दुष्काळ पिकू देत नाही पिकवलेले पीक हे शासन भाव देत नाही.त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करणे हा एकमेव पर्याय उरला असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.शेतकऱ्यांचा आवाज केंद्र शासनापर्यंत पोहोचावा यासाठी एक शेतकरी पुत्र गेल्या आठ दिवसापासून आंदोलन करत असताना शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी आला नाही.आंदोलन कर्त्यांची विचारपूस केली नाही किंवा शासन या आंदोलनाची दखल घेऊन काय उपाययोजना करत आहेत.कांदा निर्यात बंदी कधी उठणार आहे तसेच कांद्याला शासनाकडून मिळणारे अनुदान हे फक्त दोन हाप्ते मिळाले 15 ऑगस्ट रोजी सरसकट सगळे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल अस आश्वासन देणाऱ्या सरकारला विसर पडल्यामुळे त्या अनुदानाच्या संदर्भातही तात्काळ निर्णय घ्यावा.अशा मागण्या घेऊन आज हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलन स्थळे शासनाचा कुठलाही अधिकारी नसल्यामुळे आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आजचे आंदोलन थांबणार नाही ही भूमिका घेतल्यावर तात्काळ नायब तहसीलदार यांनी त्या ठिकाणी येऊन आंदोलन स्थळी भेट दिली व पुढील दोन दिवसांमध्ये आपल्या प्रश्नांसंदर्भात लवकरच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आंदोलन स्थळी येऊन आपल्याला आपल्या मागण्यांच्या संदर्भात काय शासनाकडून करण्यात आले याची माहिती दिल्या जाईल.असा शब्द दिल्याने तीन तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी सर्वसामान्य शेतकरी पुत्र गोरख संत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आठ दिवसापासून आमरण उपोषण करतोय ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकारी यापैकी कुठल्याही अधिकाऱ्यांना या आंदोलनाची माहिती नसणं किंवा त्यांनी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष देणे ही खेदाची बाबा असून या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच नायब तहसीलदारांनी आज जे पत्र आंदोलन स्थळी दाखवले ते पत्र खरे आहे की खोटे आहे याचीही पोलीस प्रशासनाने चौकशी करावी.

 येत्या दोन दिवसांमध्ये नाशिक जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी येऊन आंदोलकाची विचारपूस न केल्यास तसेच त्यांच्या मागणीच्या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास तहसीलदारांच्या दालनात छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून आंदोलन करणार. करण गायकर छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष.

या आंदोलनामध्ये छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर,प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे,उपोषण करते ग्रामीण जिल्हा संघटक गोरख संत, उपाध्यक्ष सुभाष गायकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती जयदत्त होळकर,नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ शेतकरी नेते ललित दरेकर गणेश डॉ आवारे गणेश चांदोरे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव वाढवणे,महीला आघडी प्रदेश आध्यक्ष मनोरमा ताई पाटील,रुपाली ताई काकडे,सविता ताई वाघ साहेब,वाल्मीक पुरकर,माजी सभापती विठ्ठल शेलार सुधाकर कदम,संजय कदम,आपसहेब सोनवणे,दगु सोनवणे योगेश पाटील,चांगदेव सोनवणे,बापू कदम,सचिन कदम,खंडू आहिरे,आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS