कोल्हापूर प्रतिनिधी - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्तथरारक कसरती, दिमाखदार, धिप्पाड जातिवंत घोडे, त्यांच्यावर कौशल्याने ताबा मिळविणारे घो

कोल्हापूर प्रतिनिधी – डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्तथरारक कसरती, दिमाखदार, धिप्पाड जातिवंत घोडे, त्यांच्यावर कौशल्याने ताबा मिळविणारे घोडेस्वार असा संस्थानकालीन थाट पाहण्याची संधी ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’च्या माध्यमातून कोल्हापूरकरांना मिळत आहे. 2018 पासून हा हॉर्स शो होत होता. मात्र 2020 ते 2022 मध्ये कोरोनामुळे या हॉर्स शो चे आयोजन करता आले नव्हते. मात्र आता यावर्षी पुन्हा कोल्हापुरकरांना याचा आनंद घेता येणार आहे. कोल्हापूरच्या पोलो ग्राऊंडवर या हौर्स शो चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या हॉर्स शोचे तिसरे वर्षे असून आज पासून पुढील दोन दिवस हा शो चालणार असल्याचे कोल्हापूर इक्वेटेरियन असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.
COMMENTS