मुखेड प्रतिनिधी - हिंदु धर्मातील पवित्र श्रावण महिण्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते श्रावणकावडी देवस्थान अशी काढण्यात आलेल्या कावड पदय

मुखेड प्रतिनिधी – हिंदु धर्मातील पवित्र श्रावण महिण्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते श्रावणकावडी देवस्थान अशी काढण्यात आलेल्या कावड पदयात्रेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कावड पदयात्रेत लहाण मुले,नागरीक, महिला, युवकांचा कावड घेऊन मोठा सहभाग दिसून आला.
ही कावड पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते बसस्थानक,तेलीपेठ हनुमान मंदीर,विरभद्र मंदीर ते श्रावणबाळाने आपल्या आई – वडीलास पाणी घेण्यासाठी आलेले स्थळ असलेले श्रावण चलमा येथून जल घेऊन श्रावणकावडी देवस्थान या मार्गाने काढण्यात आली. तेलीपेठ हनुमान मंदीर येथे नाजीमभाई सौदागर यांच्या वतीने कावड यात्रेतील सहभागी भक्तांस फराळासाठी केळी वाटप करण्यात आली. यावेळी टि.व्हि.सोनटक्के, संतोष बोनलेवाड, नागनाथ लोखंडे, अदनान पाशा यांच्यासह अनेक जन उपस्थित होते. तर सचिन श्रीरामे, सुधाकर जाधव यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान श्रावणकावडी येथील महादेवास श्रावण चलम्याचे पाणी कावड मध्ये घेऊन जलाभिषेक व विधिवत पुजा करुन आरती करण्यात आली. तसेच श्रावणकावडी देवस्थान शिखराच्या बांधकामाचे पुजन स्थानिक महिलांच्या हस्ते करुन शिखर बांधकामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शंभु सावकार कवटीकवार, किशोरसिंह चौहाण, किशन पाटील हाक्के, साईनाथ बोईनवाड, शेखर पाटील, गोविंद घोगरे, सतिष गुडमेवाड,राजु गंदपवाड, शिवा दारेवाड, बंटी शेट कोडगीरे, शिवाभाऊ मुद्देवाड, अशोक चौधरी, विनोद दंडलवाड, महेश मुक्कावार, शंकर नाईनवाड, सुरेश उत्तरवार, नामदेव श्रीमंगले, संतोष महाराज स्वामी, संजय वाघमारे, नागेश लोखंडे, त्रिमुख हाक्के, दत्ता घोगरे, विश्वदीप गायकवाड, रामदास हाक्के, विनोद रोडगे, बलभिम शेंडगे, संदिप पिल्लेवाड, शिवाजी चिवळे, नितिन टोकलवाड,संतोष घाळेवाड, रोहीत गजलवाड, योगेश पाळेकर, जय जोशी, दादाराव आगलावे,पवन पोतदार, सचिन रिंदकवाले, बालाजी पाटील सुगावकर, हाणमंत हाक्के, गजानन देवकत्ते, संदिप पोफळे, प्रमोद मदारीवाले,रामजी डोईजड, गजानन रोडगे,योगेश मामीलवाड, ओमप्रकाश चौधरी,बालाजी चौधरी,राहुल कंदमवार यांच्यासह शेकडो भक्त सहभागी झाले होते.
COMMENTS