Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळी येथील  ऐतिहासिक नासरजंग साहेब  दर्ग्याच्या इनामी जमीनी मालकी ताब्यात देऊन 7/12 कोरी करा,

उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू

परळी प्रतिनिधी - येथील ऐतिहासिक देवस्थान च्या जमीनी सिटी सर्वेच्या नावाखाली बोगस पी.टी.आर. च्या बर्‍याच प्रमाणात फेरफार झालेले आहे. सदरील झालेल्य

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे सेट परीक्षेत यश  
शिरूरच्या खासदारांची धरसोड भूमिका
मराठीच्या अभिजात दर्जासाठी साहित्यिक पुन्हा एकवटले

परळी प्रतिनिधी – येथील ऐतिहासिक देवस्थान च्या जमीनी सिटी सर्वेच्या नावाखाली बोगस पी.टी.आर. च्या बर्‍याच प्रमाणात फेरफार झालेले आहे. सदरील झालेल्या बेकायदेशीर ते वादग्रस्त फेर तात्काळ रद्द करुन मालकी रकान्यामध्ये देवस्थानचे नाव घेण्यात यावे.  प्रकरणी जिममेदर असलेले नगर परिषद  परळीचे मुख्याधिकारी ,दुय्यय निबंधक , तहसीलदार व या कामी मदत करणारे सर्व अधिकारी यांच्यावर तात्काळ  कार्यवाही करून त्या जमिनी देवस्थान परत देवस्थान  देण्यात याव्या व बोगस पी आय  कार्ड तात्काळ बाद करावी या मागणी माजलगाव येथील माजी नगर सेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सलीम बापू यांचे असंख्ये कार्यकर्ते समवेत  उपअधिक्ष भूमिअभिलेख कार्यालया परळी समोर आमरण उपोषण सुरू केले आहे .
परळी शहरामधील दर्गा नासरजंग ची इनामी जमीन सर्व्हे नंबर 36, 37, 38, 41, 42, 43, 36/1, 36/3 या जमीनीवर बेकायदेशीर सी.टी.सर्व्हे करुन बोगस पी.आय. कार्ड आधारे इतर लोकांची नांवे नोंद घेण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे 7/12 वर देखील बोगस कागदपत्र तयार करुन भूमाफीयांशी संगणमत व आर्थिक व्यवहार करुन धन धांडगे लोकांची नांवे मुद्दाम नोंदविण्यात आली आहेत . भूमाफियांनी  आपल्या पैशाच्या व राजकीय जोरावर अधिकारी लोकांना हाताशी धरून शासनाची व देवस्थानाची फसवणूक केलेली आहे. भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, मुख्याधिकारी नगर परिषद, व परळी तहसील कार्यालयाचे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासन जी. आर. प्रमाणे सर्व फेरफार तात्काळ रद्द करुन व वादग्रस्त 7 /12  कोरी करून मालकी रकान्यामध्ये दर्गा नासरजंग अशी नोंद घेण्यात यावी. त्या चप्रमाणे भूमिअभिलेख कार्यालयाने जो मोठा गोंधळ निर्माण केलेले आहे त्याची सुध्दा चौकशी करण्यात यावी तसेच भूमिअभिलेख कार्यालया कडून जे बोगस पी आय कार्ड देण्यात आले याची ही कसून चौकशी करावी  या साठी आम्ही आज दि. 2 मे 2023 पासून  आपल्या कार्यालयासमोर बेमुदत  उपोषण सुरू केले आहे या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहील असे ही माजी नगर सेवक तथा सामाजिक कार्यकर्ते  सलिम बापू यांनी उपोषणा दरम्यान सांगितले

COMMENTS