Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 एक्स बॉयफ्रेंडने भर रस्त्यात प्रेयसीला केली मारहाण

मारहाणीमध्ये पडलेले दोन तरुण गंभीर जखमी

कल्याण प्रतिनिधी - कल्याण नजीक असलेल्या शहाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहाड परीसरात मातोश्री कॉलेज जवळ असलेल्या एका रस्त्य

पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
दुसर्‍यांच्या वेदना वाटून घेण्याइतके दुसरे पुण्य नाही
17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

कल्याण प्रतिनिधी – कल्याण नजीक असलेल्या शहाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहाड परीसरात मातोश्री कॉलेज जवळ असलेल्या एका रस्त्यावरून तरुणी साधारण रात्री पावणे आठ च्या सुमारास जात होती. यावेळी तिने  काही दिवसां पूर्वी ब्रेकअप केलेल्या प्रियकराने (प्रणव कोनकर) तिला अडवले. प्रणव कोनकर हा रस्त्यात अडवून तिला शिवीगाळ , मारहाण करत होता. प्रणव कडून भर रस्त्यात मारहाण होत असताना तरुणीने रस्त्यावर आरडाओरडा करत मला वाचवा अशी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांकडे मदत मागितली. त्याच रस्त्यावरून योगेश चौधरी आणि उत्कृष्ट सिंग हे दोघे जात होते. त्यांनी त्या तरुणीचा आवाज ऐकून व तिला मारहाण होत असताना पाहून त्यांनी प्रणवला समजावून सांगितले. मात्र संतप्त झालेल्या प्रणव ने मदत करण्यासाठी आलेल्या दोघांना ( योगेश चौधरी आणि उत्कृष्ट सिंग) मारहाण करण्यास सुरवात केली. एवढेच नव्हे तर , या सगळ्या घटने मध्ये प्राणवने फोन करून आपल्या मित्रांना बोलावले.   जवळपास 15 जणांच्या टोळक्याने  योगेश चौधरी आणि उत्कृष्ट सिंग यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत हे दोघे ही तरूण गंभीर जखमी झाले असून या दोन्ही तरुणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी प्रणव कोनकर, दर्शन कोनकर व इतर 8 अनोळखी इसमां विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ६ जनांना ताब्यात देखील घेतले आहे. जखमी तरुणांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप जखमी तरुणांच्या कुटुंबाने केला आहे. या आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी ताब्यात घेत आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांचे कुटुंबीय करत आहेत.

COMMENTS