Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार गटाचे पुरावे गायब

आव्हाडांचा धक्कादायक दावा

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून पक्षावर दावा करण्यात येत असून, याप्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल ना

‘अहिंसा व विश्वशांतीसाठी भारताला सामर्थ्यवान बनवावे लागेल’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
बामनकावा की मराठा जातीयवाद ? 
इस्लामपूर नगरपालिकेची चौथी सभाही तहकूब

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून पक्षावर दावा करण्यात येत असून, याप्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणासमोर सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब झाले असल्याची माहिती त्यांनी दिली असल्याचे समोर आले आहे. तसा धक्कादायक दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील आमदारांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा वाद सुरु झाला आहे. या दोन्ही गटाने एकमेकांविरोधात दंड थोपाटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरु झाली आहे. शिवसेनेसारखेच हे देखील प्रकरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या सुनावणीवेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब झाले आहेत, असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अपात्रता सुनावणीवेळी केले आहे. महत्त्वाची कागदपत्रे कपाटात ठेवली होती, ती गायब झाली आहेत असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS