Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येकाने खेळातून बालपण जोपासावे – दत्तात्रय कराळे

नाशिक जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना दिमाखात सुरवात

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आज महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ग्राऊंडवर पार पडला. यावेळी प्रमुख अति

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल | LOKNews24
मणिपूर, मेघालयात भूकंपाचे हादरे
Sangamner : भाजप नेत्याच्या गाड्या रात्रीतून दिल्या पेटवून

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आज महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ग्राऊंडवर पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत – तुंगार, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल हे उपस्थित होते. प्रत्येकात जन्मतः एक खेळाडू अथवा एक कलावंत दडलेला असतो मोठं होतांना आपण कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत असतांना आपल्यातील कला गुण आणि कौशल्याकडे दुर्लक्ष करतो. या स्पर्धांमधून आपल्याला आपल्या सुप्त कला गुणांना जोपासण्याची संधी उपलब्ध होत असते त्यामुळे दैनंदिन जीवनात आणि  आपल्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी बोलतांना प्रत्येकाने आपले कौशल्य पणाला लाऊन आपला संघ व आपण उत्कृष्ठ कामगिरी कशी करेल याकडे लक्ष द्यावे असे सांगत उपस्थित सर्व खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना आज महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे सुरवात झाली. सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालय आशा १६ संघांचे पथसंचलन यावेळी पार पडले. जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख व सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी यांच्यात खेळीमेळीचा रस्सीखेच सामना आयोजित करण्यात आला होता या सामन्यात गट विकास अधिकाऱ्यांनी बाजी मारत विजय संपादन केला.  पहिल्या दिवशी महाराष्ट्र पोलिस अकॅडेमी, भोसला मिलिटरी स्कूल, यशवंत व्यायामशाळा अशा तीन ठिकाणी, क्रिकेट महिला (दिंडोरी,निफाड, सुरगाणा, पेठ, सिन्नर, मालेगाव, इगतपुरी व जि. प. मुख्यालय)  कबड्डी (महिला), खो-खो (पुरुष), थ्रो बॉल (महिला), कॅरेम (महिला), बुद्धिबळ (पुरुष), बॅडमिंटन एकेरी/दुहेरी (पुरुष), टेबल टेनिस (महिला) या स्पर्धा क्रीडा स्पर्धा व बांगलाण, येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.  दि. २४ रोजी या स्पर्धांचे आयोजन – कबड्डी (पुरुष), खो-खो (महिला ), वॉलीबॉल (पुरुष), कॅरेम (पुरुष), बुद्धिबळ (महिला), बॅडमिंटन एकेरी/दुहेरी (महिला), टेबल टेनिस (पुरुष), स्विमिंग (पुरुष), महिलांसाठी भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, धावणे, जलद चालणे, लांब उडी या क्रीडा व सुरगाणा, देवळा, चांदवड, इगतपुरी, दिंडोरी व जिल्हा परिषद मुख्यालय सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत.

COMMENTS