Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊसदर आंदोलनाच्या गुन्ह्यातून राजू शेट्टीसह सर्वजण निर्दोष

कराड / प्रतिनिधी : कराड-पाचवड फाटा येथे सन 2013 मध्ये झालेल्या ऊस आंदोलनात सातारा जिल्ह्यात सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. गावा- गावात शेतकर्‍

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे
अमूल कंपनीने पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ केली
राजेवाडी तलावाची पर्यटकांना भुरळ: पर्यटकांची गर्दी वाढू लागली

कराड / प्रतिनिधी : कराड-पाचवड फाटा येथे सन 2013 मध्ये झालेल्या ऊस आंदोलनात सातारा जिल्ह्यात सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. गावा- गावात शेतकर्‍यांनी बंद पाळला होता. सातारा जिल्ह्यातील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. कराड येथील न्यायालयात सोमवार, दि. 25 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह सर्वजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
शेतकर्‍यांनी आंदोलन हातात घेतल्यामुळे प्रशासन हतबल झाले होते. या आंदोलनात अनेक शेतकर्‍यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. कृष्णा कॅनॉलवर झालेल्या रास्ता रोकोमुळे माजी खासदार राजू शेट्टी, आ. सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील तसेच साजिद मुल्ला, साहेबराव पाटील, संदेश पाटील, रुपेश पवार, महंमद अपराध, अमित यादव, रुचिकेत यादव, बाजीराव यादव (रा. गोवारे, ता. कराड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
या याचिकेवर आज कराड येथील न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी सर्वजणांची निर्दोष मुक्तता केली. या न्यायालयीन लढण्यासाठी कोणतीही फि न घेता दावा निकाली काढून शेतकरी चळवळीस सहकार्य केल्याबद्दल कराड येथील वकिल बांधवांचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आभार यावेळी मानण्यात आलेले.

COMMENTS