Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या पक्षाला १८ वर्ष पुर्ण होऊन देखील उध्दव ठाकरे यांच्यावर बोलतात – संजय राऊत 

  मुंबई प्रतिनिधी - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सातत्याने निवडणूक आयोग त्यातील त्रुटी आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आज एक ग्रहण

पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणे पडले महागात
शिर्डीत ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोयते, चाकू घेऊन दहशत करणारे सराईत गुन्हेगारांना अटक

  मुंबई प्रतिनिधी – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सातत्याने निवडणूक आयोग त्यातील त्रुटी आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आज एक ग्रहण चिंतेचा विषय आहे त्यासंदर्भात बैठका बोलून चर्चा घडवत असतात आज सुद्धा विरोधी पक्षांची बैठक दिल्लीमध्ये बोलवली आहे. त्या बैठकीसाठी आमच्याकडून अनिल देसाई उपस्थित असतील. कशाप्रकारे ईव्हीएम हॅक होते देशभरातील जनतेची भावना आहे की निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात आपण जे मतदान करतोय ते मतदान त्यांना पोहोचते की नाही याबाबत शंका आहे आपण केलेल्या मतदानाविषयी लोकशाहीत शंका उपस्थित होते किंवा त्याला लोकशाही मानत नाही  जगभरात आज ईव्हीएम रद्द केला आहे आणि बॅलेट पेपर वरच निवडणुका होत आहेत अगदी मोदींच्या प्रिय युरोप आणि अमेरिका मध्ये देखील तेव्हा हिंदुस्थानामध्येच हट्ट का करतात इथे शंकेला वाव आहे

– मी त्यांचं भाषण ऐकलं नाही सकाळी वाचलं त्यांच्या पक्षाला 18 एक वर्ष होऊन गेली आहेत पक्ष वयात आला आहे त्यांच्या पक्षाचे काय चाललंय मला माहित नाही अठरा वर्षानंतर सुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्यावरच बोलतात उद्धव ठाकरे इतके मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरे वरती बोलतात नारायण राणे देखील इतक्या वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरच बोलत आहेत भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंवर बोलत आहे स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरे वरती बोलत आहेत.उद्धव ठाकरे यांची भीती सर्वांना वाटत आहे.

तुम्ही तुमच्या पक्षावर बोला. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी हे प्रश्न असे उफाळून वर आलेत. अनेक प्रश्न आहेत कायदा सुव्यवस्था अमृतपाल पंजाब मधून महाराष्ट्रात घुसला आहे.  त्याच्यावर कोणी बोलत नाही. फक्त तोफा फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरच त्यामुळे उद्धव ठाकरेंची धास्ती आणि वय किती आहे हे स्पष्ट होते वीस वर्षे झाली विसरा तुम्ही तुमचा पक्ष कुठे आहे ते पाहा. महाराष्ट्राचे देशाचे प्रश्न पाहा. 

उद्धव ठाकरेंनी सभा घेतली आम्ही सभा घेतली की लगेच आमच्या मागे सभा घ्यायला येतात कोण काय बोलते आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आम्हाला आमची क्षमता माहिती आहे लोक मताचा पाठिंबा आम्हाला आहे त्यांनी कान टोचण्याचा धंदा सुरू करावा काम धंदा नसेल तर नाक कान टोचायचे काम सुरू करावे

बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मागे राज्याची जनता आहे कोणाला धनुष्य मिळायला कोणाला पक्षाचे नाव मिळालं म्हणून त्यांचा पक्ष होत नाही लोकांचा पाठिंबा असायला पाहिजे भारतीय जनता पक्षाने दिलेली भाषणे सर्वच पक्ष वाचून दाखवतात आणि त्या पक्षाचा मुख्य गाभा उद्धव ठाकरे हाच आहे.

COMMENTS