Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवउद्योगासाठी कौशल्य,चिकाटीची आवश्यकता : खेडकर

पाथर्डी : नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरु करणाऱ्या नवउद्योजकांसाठी नियमित कार्यशाळा आयोजित करणे महत्वाचे असून या कार्यशाळांच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करणे, व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रेरित करणे, जोखमीचे व्यवस्थापन करणे, व्यवसायाच्या संधी सांगणे हे हेतू साध्य होतात. उद्योजकीय प्रवास हा सकारात्मक मानसिकतेतून सुरु करणे आवश्यक असून नवउद्योगासाठी कौशल्य, चिकाटी, संयम व भांडवलाची सर्वात जास्त आवश्यकता असते असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र अहिल्यानगर येथील औद्योगिक निरीक्षक ज्ञानेश्वर खेडकर यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात वाणिज्य विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ आयोजित नवउद्योजक तथा व्यवसाय समुपदेशन कार्यशाळेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे तर व्यासपीठावर शिवकुश हायटेक नर्सरीचे शशिकांत बोरुडे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ प्रशांत साळवे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ भगवान सांगळे, प्रा. दत्तप्रसाद पालवे उपस्थित होते. ज्ञानेश्वर खेडकर म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून नवउद्योजकांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात त्याचा लाभ नवउद्योजक विद्यार्थ्यांनी घ्यावा. नवीन उद्योग सुरु करण्यासाठी ५०% पर्यंत सवलती जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिल्या जातात. डॉक्टर, इंजिनीअर बरोबरच उद्योजक होण्याचीही मानसिकता विद्यार्थ्यांनी ठेवावी.   शिवकुश हायटेक नर्सरीचे शशिकांत बोरुडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या यशस्वी उद्योजकतेचा प्रवास उलगडून दाखविला. ते म्हणाले, कुठलाही व्यवसाय छोटा नसून कुठलीही नोकरी मोठी नसते हे प्रत्येक नवउद्योजकाने लक्षात ठेवावे. सध्या नोकरी मिळविणे व ती टिकविणे अवघड झाले आहे.त्यासाठी व्यवसायात उतरणे गरजेचे आहे. चिकाटी, संयम व दुरदृष्टी व्यावसायिकांमध्ये आवश्यक असून व्यवसायात उतरल्यानंतर अनंत संधी निर्माण होतात. बाजाराला काय हवे आहे आणि आपण काय शिकतो यामध्ये खूप मोठी तफावत आसून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना कौशाल्याधारित अभ्यासक्रम शिकवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली    एआय च्या युगात सेवाक्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी होणार असून उत्पादनक्षेत्राला चांगले दिवस येतील असे ते शेवटी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ भगवान सांगळे, सुत्रसंचालन डॉ विजयकुमार म्हस्के तर आभार डॉ प्रशांत साळवे यांनी मानले.

दावोसमध्ये 14 लाख 50 हजार कोटींचे करार
भारताने स्टील उत्पादनांवर लादले आयात शुल्क
शेअर बाजाराची सुरूवात झाली घसरणीने

पाथर्डी : नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरु करणाऱ्या नवउद्योजकांसाठी नियमित कार्यशाळा आयोजित करणे महत्वाचे असून या कार्यशाळांच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करणे, व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रेरित करणे, जोखमीचे व्यवस्थापन करणे, व्यवसायाच्या संधी सांगणे हे हेतू साध्य होतात. उद्योजकीय प्रवास हा सकारात्मक मानसिकतेतून सुरु करणे आवश्यक असून नवउद्योगासाठी कौशल्य, चिकाटी, संयम व भांडवलाची सर्वात जास्त आवश्यकता असते असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र अहिल्यानगर येथील औद्योगिक निरीक्षक ज्ञानेश्वर खेडकर यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात वाणिज्य विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ आयोजित नवउद्योजक तथा व्यवसाय समुपदेशन कार्यशाळेत बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे तर व्यासपीठावर शिवकुश हायटेक नर्सरीचे शशिकांत बोरुडे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ प्रशांत साळवे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ भगवान सांगळे, प्रा. दत्तप्रसाद पालवे उपस्थित होते.

ज्ञानेश्वर खेडकर म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून नवउद्योजकांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात त्याचा लाभ नवउद्योजक विद्यार्थ्यांनी घ्यावा. नवीन उद्योग सुरु करण्यासाठी ५०% पर्यंत सवलती जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिल्या जातात. डॉक्टर, इंजिनीअर बरोबरच उद्योजक होण्याचीही मानसिकता विद्यार्थ्यांनी ठेवावी.

  शिवकुश हायटेक नर्सरीचे शशिकांत बोरुडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या यशस्वी उद्योजकतेचा प्रवास उलगडून दाखविला. ते म्हणाले, कुठलाही व्यवसाय छोटा नसून कुठलीही नोकरी मोठी नसते हे प्रत्येक नवउद्योजकाने लक्षात ठेवावे. सध्या नोकरी मिळविणे व ती टिकविणे अवघड झाले आहे.त्यासाठी व्यवसायात उतरणे गरजेचे आहे. चिकाटी, संयम व दुरदृष्टी व्यावसायिकांमध्ये आवश्यक असून व्यवसायात उतरल्यानंतर अनंत संधी निर्माण होतात. बाजाराला काय हवे आहे आणि आपण काय शिकतो यामध्ये खूप मोठी तफावत आसून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना कौशाल्याधारित अभ्यासक्रम शिकवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली    एआय च्या युगात सेवाक्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी होणार असून उत्पादनक्षेत्राला चांगले दिवस येतील असे ते शेवटी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ भगवान सांगळे, सुत्रसंचालन डॉ विजयकुमार म्हस्के तर आभार डॉ प्रशांत साळवे यांनी मानले.

COMMENTS