Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडीडी चाळीत अभियंते यश थोरात व मनोज पाटील यांची कोट्यावधींची लूट

मुंबई : मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील बीडीडी चाळीच्या कामांमध्ये शाखा अभियंता यश थोरात आणि मनोज पाटील या दोन अधिकार्‍यांनी वरिष्ठांना अंधारात

राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचाच; नियम मोडणार्‍यांवर कारवाई होणार : मंत्री दादाजी भुसे
उपअभियंता अजय बापट यांचा 250 कोटींचा घोटाळा; रवींद्र नाट्य मंदिराच्या कामांमध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्ट्राचार
अबब..! रवींद्र नाट्य मंदिराच्या फक्त नुतनीकरणावर 250 कोटींचा खर्च; इतका मोठा निधी कुठे आणि कसा खर्च केला, याचे उत्तर उपअभियंता अजय बापट देणार का?बापटांचा डीपीडीसीच्या 7 कोटींचे कामे विकण्याचा घाट का ?

मुंबई : मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील बीडीडी चाळीच्या कामांमध्ये शाखा अभियंता यश थोरात आणि मनोज पाटील या दोन अधिकार्‍यांनी वरिष्ठांना अंधारात ठेवून कोट्यावधींची बोगस कामे करत कोट्यावधींचा अपहार केला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, या दोन्ही अधिकार्‍यांकडे ऑफलाईन आणि सीआरची कामे असून, त्या दोघांनी संगनमताने कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला. यामध्ये यश थोरात यांच्याकडे व्ही शाखा अंतर्गत बीडीडी चाळीतील चाळ 41 ते 82 असून सेक्शन ए आणि बी अंतर्गत त्यांनी कोणतेही काम न करता कोट्यावधी निधींचा अपहार केला, त्यांच्यासोबतच शाखा अभियंता मनोज पाटील यांच्याकडे चाळ 83 ते 121 असून यांनी ऑफलाईन आणि सीआरच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. या चाळीतील कामांसाठी कर्मचार्‍यांना साफ-सफाईचे विविध साहित्य पुरवावे लागतात, मात्र यश पाटील आणि मनोज पाटील या दोन्ही अभियंत्यांनी कोणतीही साधने आणि साहित्य न पुरवता त्यात देखील कोट्यावधींचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही अभियंत्यांनी आपल्या वरिष्ठांना अंधारात ठेवत शासकीय निधीची लूट चालवली असून, याप्रकरणी दोन्ही अधिकार्‍यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खातेनिहाय चौकशी करण्याची गरज आहे. तसेच या अभियंत्यांनी बीडीडी चाळीतील खोल्या विक्रीमध्ये मोठी अफराताफर करत, मोठ्या प्रमाणावर निधींची लूट केली आहे. या अभियंत्यांनी एकाधिकारशाहीचा वापर करत दंडेलशाहीचा वापर करत कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे.


उप अभियंता नंदकुमार पाटील बदलीच्या आदेशाला जुमानेना
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभाग क्रमांक दोनमध्ये कार्यरत असलेले उपअभियंता नंदकुमार पाटील यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. याप्रकरणी कार्यकारी अभियंता श्रीमती स्वाती पाठक आणि मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांनी आपल्या विभागातील या भ्रष्टराचारावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. शासनाने बदलीचा आदेश काढूनही नंदकुमार पाटील अजूनही आपल्या पदाचा कायर्र्भार न सोडता आपण शासकीय आदेशाला जुमानत नसल्याचा अप्रत्यक्ष इशारा तर नंदकुमार पाटील देत नाही ना, अशी शंका उपस्थित होते. पदभार सोडण्यास टाळाटाळ करण्यामागे मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे. विभागात सुमारे आठ कोटी रुपयांच्या अ‍ॅडजेस्टमेंट बिलांबाबत अनियमितता झाल्याची चर्चा असून, त्यासंदर्भातील देयके काढण्यासाठीच पदावर कायम राहण्याचा अट्टाहास केल्याचा आरोप होत आहे.

COMMENTS