Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज शहरातील अतिक्रमणे 15 जुन पर्यंत अतिक्रमण काढून घेण्याचा इशारा

16 जून पासून अतिक्रमण धारकावंर प्रशासन हातोडा

केज प्रतिनिधी - केज शहरातील शासकीय जागा आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत परंतु हि अतिक्रमणे हटवण्यासाठी प्

पुण्यात हॉटेलची तोडफोड करत लुटले
एकाच आठवड्यात चार दुचाकी लंपास
शेतकरी मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर दाखल

केज प्रतिनिधी – केज शहरातील शासकीय जागा आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत परंतु हि अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. हि अतिक्रमणे हाटवली तर शासकीय जागा आणि शासकीय कार्यालयांचा परिसर रिकामा होईल परंतु त्याच वेळी छोटे व्यावसायिक मात्र कमालीचे अडचणीत येणार आहेत. त्यांना स्थानिक नेत्यांनी तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असी मागणी होत आहे.
केज शहरातील शासकीय जागा व शासकीय कार्यालयांच्या परिसरात वर्षानुवर्षे बसलेल्या अतिक्रमण धारकांना केज तालुका प्रशासनाच्या वतीने दि . 15 जुन पर्यंत आपले अतिक्रमण काढून घेण्याचा इशारा देण्यात आला आहे . दि . 16 पासून अतिक्रमण धारकावंर प्रशासन हातोडा चालवणार आहे . काल दि . 12 रोजी केज तालुक्यातील सर्व प्रशासकीय , शासकीय अधिकारी यांची बैठक झाली असून यात हा निर्णय घेतला आहे . अतिक्रमण उठवल्यास मात्र अनेकांच्या उपजिवीकांचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने तालुक्यातील राजकीय मंडळींनी अनेक वेळा व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे . तो प्रश्न आता पुढे येण्याची शक्यता आहे .

COMMENTS