Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण; स्थानिक नागरिकांचा उपोषणाचा इशारा

फलटण / प्रतिनिधी : नगरपरिषद फलटण हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील सिटी सर्वे नंबर 6487 सेक्टर 2 च्या शासकीय खुल्या भूखंडाच्या उत्तर बाजूस प्लॉट नंबर 4

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा देशात पहिले; कराडची हॅटट्रीक चुकली; पहिल्या दहामध्ये पाचगणीसह कराडचा समावेश
मेढा नगरपंचायतीसमोर बाधितांसह रहिवाशी शेतकर्‍यांचे सोमवारी आंदोलन
पत्रकार राहूल तपासेंना जीवे मारण्याचा प्रयत्न : महामार्गावरील घटना; एकजण ताब्यात

फलटण / प्रतिनिधी : नगरपरिषद फलटण हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील सिटी सर्वे नंबर 6487 सेक्टर 2 च्या शासकीय खुल्या भूखंडाच्या उत्तर बाजूस प्लॉट नंबर 4 व 5 च्या धारकांनी बेकायदा बांधकाम केले आहे. फलटण नगरपरिषदेकडे वारंवार तक्रार करूनही यावर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या मूलभूत हक्काला बाधा येत असल्याने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दिला. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात झाली नाही. नगरपरिषदेकडून अतिक्रमणावर कारवाई करण्यात दिरंगाई करण्यात का होते?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सिटी सर्वे नंबर 6487 सेक्टर 2 मधील प्लॉट नं. 4 व 5 यांनी लगतच्या दक्षिण बाजूकडे असणाच्या मंजूर रेखांकनातील खुली जागेत अतिक्रमण करून त्याचा बेकायदेशीर वापर सुरू केला आहे. याबाबत फलटण नगरपरिषदेकडे सातत्याने तक्रारी अर्ज देऊन त्याच्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे नगर परिषदेच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड हे उडवा-उडवीची उत्तरे देऊन दाखल तक्रार अर्ज विनाकारवाई निकाली काढत असून यामुळे शहरात अतिक्रमणे वाढत आहेत.
खुल्या भूखंडास तिन्ही बाजुने संरक्षण भिंत उभारण्यात आली असून अतिक्रमण केलेल्या बाजूने भिंत उभारण्यात आली नाही. भिंत उभारण्यात अडथळा निर्माण करणारी बेकायदा बांधकाम हटवावे अशी तक्रार यापूर्वी लेखी स्वरूपात केली होती. त्यावर मुख्याधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसून नगरपालिकेकडून उडवा-उडवीची उत्तरे देऊन तक्रार अर्ज निकाली काढला जात असून यामागे नगरपालिकेचा हेतू संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे.
नगर परिषद हद्दीतील असे अनेक खुले भूखंडावर अतिक्रमणे करण्यात आली असून तक्रारी दाखल होऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नगर परिषदकडूनच एक प्रकारे अतिक्रमणे करण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकंदरीतच जबाबदार अधिकारीच बेजबाबदारपणे वागत असल्याने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सदर ठिकाणी लगत असणार्‍या एका अतिक्रमण करणार्‍या प्लॉट धारकास नगर परिषद कडून नियमबाह्य परवानगी दिली असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या नवीन बांधकाम करणार्‍या धारकाने याठिकाणी मागील बाजूस चालू स्थितीत नियमबाह्य बांधकाम सुरू असून यावर बांधकाम विभाग काहीही हरकत घेत नसल्याने याठिकाणी जोमात अतिक्रमण सुरु आहे.
लक्ष्मीनगर येथील सिटी सर्वे नंबर 6487 सेक्टर 2 मधील खुल्या भूखंडावर झालेले अतिक्रमण नगर परिषद यांनी न काढल्यास ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आता प्रशासक म्हणून काम पहाणारे मुख्याधिकारी संजय गायकवाड हे खुल्या भुंखंडावर झालेले अतिक्रमण पाडून खुला भूखंड खुला करणार की दुर्लक्ष करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS