Homeताज्या बातम्यादेश

आणीबाणी हा देशातील काळा अध्याय ः राष्ट्रपती मुर्मू

विकसित भारत बनवण्यासाठी नवी गती मिळाल्याचा विश्‍वास

नवी दिल्ली ः 18 व्या लोकसभेची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने गुरूवारी सुरूवात झाली असून, त्यांनी पुन्हा एकदा नवा आणि विकसित

मराठवाडयात दोन तरूण शेतकर्‍यांच्या आत्महत्या ; औरंगाबाद आणि बीड येथील शेतकर्‍यांनी कवटाळले मृत्यूला
निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून सोसायट्या जिंकल्या
पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट

नवी दिल्ली ः 18 व्या लोकसभेची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने गुरूवारी सुरूवात झाली असून, त्यांनी पुन्हा एकदा नवा आणि विकसित भारत बनवण्यासाठी गती मिळाल्याचा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी 25 जून 2024 रोजी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षांच्या निमित्ताने अभिभाषणात भाष्य करतांना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, जेव्हा संविधान तयार होत होते, तेव्हाही जगात अनेक गट होते, जे भारताच्या अपयशी होण्याची इच्छा व्यक्त करत होते. देशात संविधान लागू झाल्यानंतरही संविधानावर अनेकदा हल्ले झाले आहेत. 25 जून 1975 ला लागू झालेली आणीबाणी ही संविधानावरील थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता, असे वक्तव्य राष्ट्रपती मुर्मू यांनी केले. यावेळी आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, 18 व्या लोकसभेच्या सदस्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही देशातील मतदारांचा विश्‍वास जिंकला आहे. हे सौभाग्य फार कमी लोकांना मिळते. मला आशा आहे की तुम्ही तो पाळाल. माझे सरकार ईशान्येत कायम शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे. असे सांगताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधकांच्या गदारोळात राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरूच ठेवले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करताच विरोधकांनी नीट-नीटच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, संसद सुरळीत चालली की आरोग्यदायी चर्चा होते. संपूर्ण व्यवस्थेवर लोकांचा विश्‍वास वाढतो. भारत विकसित राष्ट्र होईल तेव्हा तुम्हीही त्यात सहभागी व्हाल. येणारे युग भारताचे आहे, शतक भारताचे आहे, त्याचा प्रभाव हजार वर्षे टिकेल. आजचा काळ भारतासाठी पूर्णपणे अनुकूल आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आज कोणती धोरणे आणि निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. गेल्या दहा वर्षात जे काही घडले त्यामुळे आपण विकसित भारत बनवण्यासाठी नवी गती प्राप्त केली आहे. आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरमध्येही ज्या ठिकाणी कलम 370 मुळे हे शक्य झाले नाही अशा ठिकाणी संविधानाची पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. येत्या काही महिन्यांत भारत प्रजासत्ताक म्हणून 75 वर्षे पूर्ण करणार आहे. देशात संविधान लागू झाल्यानंतरही अनेक हल्ले झाले आहेत. आज 27 जून, 25 जून 1975 ला लागू करण्यात आलेली आणीबाणी हा राज्यघटनेवर झालेल्या हल्ल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. पण यातून देश सावरला असल्याचे देखील राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

COMMENTS