Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न 

नाशिक : जल शक्ती मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या निर्देशान्वये जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थो

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरीता प्रयत्न करणार :मंत्री छगन भुजबळ
शनिवारी बुलढाण्यात सर्व  समाजातिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ! 
एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती – आ. गोपीचंद पडळकर  

नाशिक : जल शक्ती मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या निर्देशान्वये जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केलेल्या आवाहनानुसार प्राथमिक, माध्यामिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

आज जिल्हा परिषदेच्या दोन्ही सभागृहात वरिष्ठ व कनिष्ठ गटात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सीनिअर कॉलेज साठी  डॉ.कैलास रमेश खोंडे, प्रा.अरुण बुधाजी सोनवणे,तर ज्युनिअर कॉलेज साठी प्रा.मनोहर रामदास धामणे व प्रा ज्योत्स्ना दिलीप पाटील यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तालुका स्तरावरील स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेले स्पर्धक यामध्ये सहभागी झाले.

 दोन्ही गटाकरीता स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये अनुक्रमे २१ हजार, ११ हजार व साडेपाच हजार रूपये पुरस्काराचे स्वरूप असून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी दिली.

*स्पर्धेतील विजयी स्पर्धक याप्रमाणे :-*

*वरिष्ठ गट*…कोमल नरेंद्र शेलार तालुका मालेगाव.(प्रथम) वरुण प्रकाश घरटे(द्वितीय) तालुका मालेगाव कु. राजश्री संतोष देवरे तालुका बागलाण(तृतीय)

*कनिष्ठ गट* सृष्टी यशवंत पाटील तालुका बागलाण (प्रथम) कु. समृद्धी संजय मोराणकर तालुका मालेगाव (द्वितीय) व कु.संचिता भगवान धांडे तालुका इगतपुरी (तृतीय)

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील रवींद्र बराथे, राहुल मराठे, संदीप जाधव, राजेश मोरे, गुलाब गायकवाड,सचिन गवळी ,किशोर शिरसाळे यांनी प्रयत्न केले. जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात 

निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुपट स्पर्धा घेण्यात आल्या.

COMMENTS