वर्षभरात 317 कोटी रुपयांच्या वीज चोर्‍या उघड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्षभरात 317 कोटी रुपयांच्या वीज चोर्‍या उघड

राज्यभरातील महावितरणच्या भरारी पथकांची कामगिरी

मुंबई/प्रतिनिधी ः महावितरणने वीजचोरांविरुध्द कंबर कसली असून सुरक्षा अंमलबजावणी विभागासोबत विभागीय स्तरावरील भरारी पथकांच्या माध्यमातून ही मोहीम अधिक

Sangamner : दिवाळीच्या खरेदीसाठी संगमनेर शहरातील रस्त्यांवर गर्दीच गर्दी (Video)
राहुरी तालुका व्यापारी सह. पतसंस्थेला 16 लाखाचा नफा ः प्रकाश पारेख
sangamner – संगमनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आरिफ देशमुख यांची निवड l LokNews24

मुंबई/प्रतिनिधी ः महावितरणने वीजचोरांविरुध्द कंबर कसली असून सुरक्षा अंमलबजावणी विभागासोबत विभागीय स्तरावरील भरारी पथकांच्या माध्यमातून ही मोहीम अधिक प्रखरपणे राबविण्यात येत आहे. उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये 22 हजार 987 ठिकाणी 317 कोटी 45 लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघडकीस आणल्या आहेत. त्यापैकी 172 कोटी 45 लाख रुपयांची वसुली झाली आहे.
सन 2021-22 मध्ये तब्बल 557 दशलक्ष युनिट विजेची चोरी उघडकीस आणत महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या माध्यमातून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या या विक्रमी कामगीरीमुळे महावितरणची वीजहानी कमी करण्यासोबत महसुलामध्ये वाढ होण्यासाठी मदत होत आहे. ग्राहकांना उत्कृष्ट व अविरत सेवा देण्यासाठी महावितरण सदैव प्रयत्नशील असून त्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कृषीपंप वीजजोडणी धोरण-2020, सौर कृषिपंप योजना, विलासराव देखमुख अभय योजना, मीटर रिडींग व्यवस्थापन इत्यादिंचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून वीज गळती कमी करण्यासाठी व प्रामुख्याने वीजचोरी विरोधात धडक कारवाईसाठी काम करणार्‍या महावितरणमधील सुरक्षा व अंमलबजावणी विभागांतर्गत राज्यात परिमंडलस्तरावर 8, मंडलस्तरावर 20 तर विभागीय स्तरावर 40 अशी एकूण 71 पथके असून यात सुमारे 345 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील मंडलस्तरावरील 20 पथके गेल्या नोव्हेंबर 2021 मध्ये नव्याने स्थापन करण्यात आली आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सातत्याने घेतलेल्या आढाव्यामुळे गेल्या एका वर्षामध्ये सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचा चेहरामोहरा बदलला असून हा विभाग महावितरणसाठी एक नफा केंद्रे झाले आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीजवापराचे विश्‍लेषण करून संशयित ठिकाणी वीजयंत्रणेची तपासणी करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे. त्यासाठी महावितरणची माहिती व तंत्रज्ञान प्रणाली वापरण्याची या विभागाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे वीजचोर्‍यांच्या संख्येऐवजी विजेच्या युनिटची अधिक चोरी होणार्‍या ठिकाणी आता लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. परिणामी या विभागाने आतापर्यंत सन 2021-22 मध्ये सर्वाधिक 557.53 दशलक्ष युनिटची वीजचोरी उघड केली आहे. याआधी जास्तीत जास्त 168 दशलक्ष युनिटची वीजचोरी उघड करण्याचा या विभागाचा विक्रम होता. परंतु त्यापेक्षा तिप्पट वीजचोरी उघड करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी नुकताच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी वीजचोरी ही महावितरणला लागलेली कीड आहे, वीजचोरीचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत, महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयासोबतच सुरक्षा व अंमलबजावणीच्या पथकांनी वीजचोरीविरुध्द कठोर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने कोंकण प्रादेशिक विभागामध्ये 7834 ठिकाणी 152 कोटी 43 लाख, पुणे प्रादेशिक 5527 ठिकाणी 72 कोटी, नागपूर प्रादेशिक 5503 ठिकाणी 63 कोटी 23 लाख आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात 4123 ठिकाणी 29 कोटी 80 लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघड केल्या आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू असलेल्या स्मार्ट चोर्‍या उघडकीस आणण्यात आल्या आहेत.

वीज चोरी क्लुप्यांवर मात
वीजचोरीच्या विविध तांत्रिक क्लुप्त्या तसेच स्मार्ट पध्दतीचा अभ्यास करून त्यावर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या सोमवारी विभागांतर्गत चर्चा करून त्यावर उपाययोजना निश्‍चित करण्यात येते. त्यामुळे राज्यात वीज चोरीविरुध्द प्रभावी व कठोर मोहिमा राबविण्याचे काम सुरू झाले आहे. वीजचोरीच्या विविध प्रकारांसोबतच तपासणीदरम्यान भरारी पथकांना सुमारे 35 ते 40 प्रकारच्या अनियमितता देसून येत आहेत. त्या नियमित करून महावितरणचा महसूल देखील वाढविण्यात येत आहे.

COMMENTS