Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे परिमंडलातील 40 हजार 915 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

पुणे ः वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदा

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धूम स्टाईलने पळविले
काकडे कुटुंबियांकडून यशस्वी उद्योजकांचा सन्मान
महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात

पुणे ः वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील 40 हजार 915 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
दरम्यान, पुणे परिमंडलातील 6 लाख 6 हजार 568 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 132 कोटी 89 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे शहरातील 2 लाख 65 हजार 358 ग्राहकांकडे 44 कोटी 78 लाख आणि पिंपरी चिंचवड शहरातील 1 लाख 28 हजार 5 ग्राहकांकडे 33 कोटी 8 लाख रुपये तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील 2 लाख 13 हजार 205 ग्राहकांकडे 55 कोटी 3 लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. वीज खरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना आदींचा सर्व खर्च वीजबिल वसूलीवरच अवलंबून आहे. मात्र वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला. यात गेल्या दीड महिन्यात 40 हजार 915 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये पुणे शहरातील 27 हजार 84, पिंपरी चिंचवड शहरातील 7 हजार 44 तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील 6 हजार 787 थकबाकीदारांचा समावेश आहे.

COMMENTS