Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा  : मुख्य अभियंता दीपक कुमठेकर

नाशिक:  देशभर सुरू असलेल्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंब

नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या
थरार! गावकऱ्यांनी चक्क अधिकाऱ्यांना ठेवले डांबून
सोलापूर:तलाठयाच्या झिरोला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

नाशिक:  देशभर सुरू असलेल्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत केंद्र शासनाकडून सबसिडी देण्यात येत  असून वीज ग्राहकांनी या योजनेचा तात्काळ लाभ घ्यावा. ग्राहकाला  गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शुन्य होते आणि  शिल्लक वीज महावितरण विकत घेते, ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले वीज बिल शून्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले.

ते महवितरण व  सोलर बीएनआय यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल रॅडीसन येथे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या “शाश्वत कुंभ” या कार्यक्रमात उपस्थित सौरप्रणाली विक्रेते, ग्राहक आणि महावितरणचे अभियंते यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. 

याप्रसंगी महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे , नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र ढोबळे, सोलर बीएनआयचे मयूर पांडे मंचावर उपस्थित होते. 

  सौर प्रणालीमध्ये सुद्धा अत्याधुनिक नवनवे बदल होत असून पूर्वीच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. नाशिक परिमंडलातील सर्व  महावितरण कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व तसेच आपल्या सर्व थेट ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचून त्यांना या योजनेची सविस्तर माहिती व फायदे सांगून ही  योजना १००% यशस्वी करावी असे आवाहन दीपक कुमठेकर यांनी केले. 

मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे यांनी, ग्राहकांना शून्य वीजबिल करणारी व वीज गळतीचे प्रमाण कमी करणारी योजना असल्याचे सांगितले. सोबत वीज सुरक्षेविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सौर यंत्रणा व सौर पम्प उभारणीवेळी काय दक्षता घ्यावी याबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी माहिती दिली. 

अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी,  भविष्यातील राज्याची होणारी प्रगती सौर ऊर्जेमुळे होणार असून पुढील काळ हा सौर प्रणालीचा असणार आहे.  या योजनेचा लाभ ग्राहकांना मिळवून द्यायचा असून ही योजना राबविताना ग्राहक आणि एजन्सी येणाऱ्या अडचणी व तक्रारी सोडविण्यासाठी महावितरण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी ‘प्रधानमंत्री – सूर्यघर मोफत वीज योजने’त उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या तीन उपविभागीय कार्यालयांच्या अभियंत्यांचा  सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये अनुक्रमे  द्वारका,  गंगापूर आणि ओझर या कार्यालयाच्या समावेश होता. यावेळी उपस्थित ग्राहक व एजन्सी प्रतिनिधी यांनी विचारलेले विविध प्रश्न, तक्रारी व शंकांचे निरसन मुख्य अभियंता दिपक कुमठेकर आणि अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले. ग्राहकांना योजनेविषयक संपूर्ण माहिती, सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल ग्राहकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलर बीएनआयचे रोहन उपासनी यांनी केले.  तर सूत्रसंचालन मनीषा एकबोटे यांनी तर आभार प्रदर्शन मयूर पांडे यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंते नंदकिशोर काळे, जगदीश जाधव व केशव काळूमाळी यांच्यासह नाशिक मंडळातील सर्व उपविभागीय अभियंते, सहाय्य्क अभियंते (गुणवत्ता व नियंत्रण), सौर एजन्सी यांचे प्रतिनिधी व ग्राहक उपस्थित होते.

COMMENTS