Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहर सहकारी बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका थांबल्या

सहकार विभागाचा निर्णय, 20 नंतर होणार निर्णय

अहमदनगर प्रतिनिधी - नगर शहरातील शहर सहकारी बँकेसह जिल्ह्यातील 21 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सरकारने अचानक थांबवली आहे. याबाबत 20 डि

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती
कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून जास्तीत तपासण्या करा – ना. बाळासाहेब थोरात
सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने पळवले

अहमदनगर प्रतिनिधी – नगर शहरातील शहर सहकारी बँकेसह जिल्ह्यातील 21 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सरकारने अचानक थांबवली आहे. याबाबत 20 डिसेंबरनंतर निर्णय होणार आहे. शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीचे मतदान येत्या 11 डिसेंबरला होणार आहे. पण अचानक या बँकेची निवडणूक आहे त्या स्थितीत थांबवल्याने निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांमध्ये निराशा पसरली आहे. तीन-चार महिन्यांपूर्वीही अशाच पद्धतीने अगस्ती सहकारी साखर कारखाना व जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रियेत मतदान बाकी असताना या निवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर या संस्थांनी न्यायालयात दाद मागितल्यावर त्यांच्या निवडणुका झाल्या. या पार्श्‍वभूमीवर, सध्या निवडणुका थांबवलेल्या संस्था न्यायालयात जातात की, 20 डिसेंबरपर्यंत वाट पाहतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

 राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील 21 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर शहर सहकारी बँक, नगर मर्चंट बँक, रूख्मी बँक श्रीगोंदा, स्वामी समर्थ बँक पारनेर, कोपरगाव पीपल्स बँक, छत्रपती ग्रामसेवक पतसंस्था, नगर मजूर फेडरेशन यासह 21 छोट्या-मोठ्या संस्थांचा समावेश आहे. सहकार विभागाने मागील महिन्यात काही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था व अमृतवाहिनी बँकेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अन्य संस्थांच्या निवडणुकांचे मतदान डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात आले. मात्र, आता त्यांना स्थगिती मिळाल्याने त्यांनाही 20 डिसेंबरनंतर होणार्‍या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे. राज्यात सध्याला सात हजार 143 इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सुरू होता. यात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील सुरू झाल्या आहेत. यातून तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील ‘अ’ वर्गातील एकच जिल्हा सहकारी बँक असून, तिची निवडणूक झाली आहे. आणि सध्या ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात 21 सहकारी संस्था येतात. यातील शहर सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चिन्ह देखील वाटप करण्यात आले आहे. या बँकेसाठी 11 डिसेंबरला मतदान होणार आहे. मर्चंट बँकेसाठी मतदारांची प्रारूप यादी देखील जाहीर झाली आहे. इतर संस्थांच्या निवडणुका देखील होत आहे. यातच शासनाचे आदेश आल्याने 20 डिसेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

COMMENTS