Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारच्या दबावामुळेच निवडणुका लांबणीवर : देशमुख

मुंबई ः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर खापर फोडण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीव

पुस्तकांचे गाव भिलार पाठोपाठ महाबळेश्‍वर तालुक्यातील मांघर होणार पहिले मधाचे गाव
रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांसमवेतच्या आढावा बैठकीत रूसा अंतर्गत २६.५१ कोटी अनुदानाचे वाटप
कोपरगाव काँगे्रसकडून कर्नाटकातील विजयाचा जल्लोष

मुंबई ः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर खापर फोडण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर पाडण्याचा निर्णय हा सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने घेतला असल्याचा खळबळजनक आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आता विधानसभा निवडणूक घ्यायला देखील हे सरकार घाबरत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. निवडणुका कशा पद्धतीने पुढे ढकलाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे देखील ते म्हणाले. निवडणूक आयोगाच्या वतीने हरियाणा राज्याच्या विधानसभाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील निवडणुका अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक कारणे देखील दिले आहेत. मात्र आता महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुका या डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या वतीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर आरोप केले जात आहे. सरकारच्या दबावाखालीच निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका झाल्यास राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार नक्की येईल, असा दावा देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. मात्र पराभवाच्या भीतीमुळे सरकार निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. 

COMMENTS