Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यातील पाच ग्रामपंचायतीचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर

श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये मृत्यू अतिक्रमण तसेच जात वैधता प्रमाणपत्र नस

प्रतीक्षा भांगरे बुद्धीमापन स्पर्धेत राज्यात द्वितीय
अहमदनगर जिल्ह्यात 17 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
देशात व राज्यात परिवर्तनाची लाटः आकाश नागरे

श्रीगोंदा प्रतिनिधी– श्रीगोंदा तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये मृत्यू अतिक्रमण तसेच जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये निंबवी,घुगलवडगाव, देऊळगाव ,चवरसांगवी, टाकळी कडेवळीत या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून निंबवी या ठिकाणी आप्पासाहेब शिर्के हे मृत्यू झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती तसेच घुगल वडगाव या ठिकाणी जयश्री सुनील  चव्हाण यांनी अतिक्रमण केल्यामुळे या ठिकाणी जागा रिक्त झाली होती तसेच देऊळगाव येथे नंदाबाई दिलीप गायकवाड यांचा मृत्यू झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती तसेच चवरसांगवी या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ही जागा रिक्त करण्यात आली तसेच टाकळीकडेवळीत येथील सतीश नवले मयत झाल्यामुळे त्या ठिकाणी जागा रिक्त झाली होती या रिक्त झालेला जागेवर निवडणूक आयोगाकडून पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आली असून यासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी 25 एप्रिल ते 2 मे पर्यंत मुदत ठेवण्यात आली असून आलेल्या अर्जावर छाननी 3 में रोजी करण्यात येणार आहे या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी 8 में हि तारीख देण्यात आली असून त्याच दिवशी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होणार आहे तर या निवडणुकीची 18 मे रोजी मतदान होणार आहे असून याची मतमोजणी 19 मे रोजी होणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे

COMMENTS