Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंजारा ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी राहुल राठोड यांची निवड

बीड प्रतिनिधी - शहरातील राहुल राठोड यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक सामाजिक, राजकीय व संघटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता बंजारा ब्रिगेडचे राष्ट्

सलग 11 व्यांदा व्याजदर जैसै थे !; विकासदर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज
प्राचार्य डॉ.गावित यांनी मराठी संशोधन विभागाला उपक्रमशील गुणवत्ता दिली ः डॉ. बाबुराव उपाध्ये
मंजूर गावातून लाख रुपयेचा गांजा जप्त

बीड प्रतिनिधी – शहरातील राहुल राठोड यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक सामाजिक, राजकीय व संघटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या आदेशाने तसेच विभागीय अध्यक्ष हनुमंत पवार, विभागीय उपाध्यक्ष पी.डी.राठोड, विभागीय सचिव छगन पवार व जिल्हा प्रभारी डॉ. मुकेश राठोड यांच्या सहमतीने  बंजारा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या बीड शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड शहरातील संघटना बांधणीसाठी वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सोबत समन्वय ठेवून संघटनेची पुढील ध्येयधोरणे राबवावीत तसेच बंजारा समाजाला मान, सन्मान, न्याय, हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य करावे असे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आवाहन केले आहे. यावेळी  लोकशाही मार्गाने तसेच भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहुन समाजहित, जनहित, राष्ट्रहित जोपासून संघटना वाढीसाठी प्रयत्न राहील असे प्रतिपादन राहुल राठोड यांनी केले.

COMMENTS