नवी दिल्ली ः स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून, भाजपप्रणित एनडीएकडून पुन्हा एकदा भाजपचे खासदार ओम बिर्ला यांना संध
नवी दिल्ली ः स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून, भाजपप्रणित एनडीएकडून पुन्हा एकदा भाजपचे खासदार ओम बिर्ला यांना संधी देण्यात आली असून, दुसरीकडे इंडिया आघाडीकडून काँगे्रसचे 8 वेळा खासदार राहिलेले के. सुरेश यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूूक होणार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभेच्या संकेतानुसार अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाकडे असावी असा संकेत आहे. मात्र मोदी सरकारने 17 व्या लोकसभेमध्ये उपाध्यक्षपद विरोधकांना दिलेच नव्हते. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, जर सरकारने उपाध्यक्षपद विरोधकांकडे दिले तर, ते अध्यक्षपदासाठी पाठिंबा देतील अशी भूमिका काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. राहुल गांधी यांच्यासोबतच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील तशीच भूमिका घेतल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधार्यांची कोंडी होतांना दिसून येत आहे. भाजप विरोधकांना उपाध्यक्षपद देवून अध्यक्षपदाची निवडणूक टाळू शकते, की विरोधकांचा विरोध डावलून निवडणूक घेणे पसंद करेल, याचे भवितव्य आज बुधवारी ठरणार आहे. लोकसभा अध्यक्षाबाबत सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष वाढला आहे. ओम बिर्ला यांनी सरकारच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्षाचे खासदार एनके प्रेमचंद्रन यांच्या मते, काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी बिर्ला यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. राहुल गांधी यासंदर्भात बोलतांना म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांना राजनाथ सिंह यांचा अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्यासाठी फोन आला होता. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे विरोधकांनी स्पष्टपणे सांगितले आहे, मात्र उपाध्यक्षपद विरोधकांना मिळाले पाहिजे. राजनाथ सिंह यांनी पुन्हा फोन करण्याबाबत बोलले होते, मात्र अद्याप फोन आलेला नाही.
ओम बिला पुन्हा होणार लोकसभेचे अध्यक्ष – राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे 2019 ते 2024 पर्यंत स्पीकर होते. सलग दुसर्यांदा लोकसभा अध्यक्षपद भूषवणारे ते भाजपचे पहिले खासदार ठरणार आहेत. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यास ते काँग्रेसच्या बलराम जाखड यांच्या विक्रमाची बरोबरी करतील. बलराम जाखड हे 1980 ते 1985 आणि 1985 ते 1989 या काळात सलग दोनदा लोकसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी त्यांचे दोन्ही कार्यकाळ पूर्ण केले होते. याशिवाय जीएमसी बालयोगी आणि पीए संगमा यांसारखे नेते दोनदा लोकसभा अध्यक्ष झाले, परंतु प्रत्येकी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.
COMMENTS