मुंबई ः लोकल रेल्वे प्रवासातील भांडण मुंबईकरांना तसे नवीन नाही. मात्र या भांडणातून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. लोकल रेल

मुंबई ः लोकल रेल्वे प्रवासातील भांडण मुंबईकरांना तसे नवीन नाही. मात्र या भांडणातून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. लोकल रेल्वेतील वृद्धांची सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर येत असून, रेल्वे लोकलमध्ये पोलिस संरक्षण वाढवण्याची मागणी होत आहे. लोकल रेल्वेमध्ये सहप्रवाशासोबत झालेल्या भांडणातून एका वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबईतील ठाणे येथे गुरूवरी ही घटना घडली. या प्रकरणी संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरकोळ वादातून वृद्ध व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आंबिवली येथे राहणारे बबन देशमुख (65) कल्याण येथे कामानिमित्त आले होते. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते काम आटोपून लोकलने घरी निघाले होते. लोकलच्या टिटवाळा बाजूकडील मालडब्यातून प्रवास करत असलेल्या बबन यांचा सहप्रवाशाशी वाद झाला. यातून या सहप्रवाशाने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी दोनच्या सुमारास कल्याण स्थानकावर रेल्वेच्या डब्यात एक वृद्ध व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच कल्याणचे रेल्वे पथक घटनास्थळी पोहोचले. परंतू तोपर्यंत वृद्धाचा मृत्यू झाला होता. यादरम्यान डब्यात उपस्थित असलेल्या इतर लोकांनी आरोपीला पकडले व रेल्वे पथकाच्या ताब्यात देण्यात आले. घटनेच्या चौकशीदरम्यान वृद्धाचा आरोपीसोबत वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादातूनच आरोपीने वृद्धास धक्काबुक्की केली व जड वस्तूने डोक्यात गंभीर दुखापत केल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचा शोध घेत असून, आरोपींवर कारवाई करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
COMMENTS