Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैशाच्या वादातून केला मोठ्या भावाचा खून

पुणे - व्यवसायासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून लहान भावाने राहत्या घरातच थोरल्या भावावर चाकूने वार करून त्याचा खून केला. या घटनेत लहान भावाने मोठ

पुण्यात कुख्यात गुंडाची दगडाचे ठेचून हत्या
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याची धारदार शस्त्राने हत्या
चित्रपट पाहून सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या

पुणे – व्यवसायासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून लहान भावाने राहत्या घरातच थोरल्या भावावर चाकूने वार करून त्याचा खून केला. या घटनेत लहान भावाने मोठ्या भावाच्या मानेवर व छातीवर अनेक वार करून खून केला. कल्पेश अरुण धुळप ( 26, रा.तावरे पेट्रोल पंपामागे, अमरसिंह कॉलनी, बु ता. बारामती जि.पुणे), असे खून झालेल्या थोरल्या भावाचे नाव आहे.
याप्रकरणी आरोपी मंथन अरुण धुळप (23) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आई सुरेखा अरुण धुळप (50) यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9.30 वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ कल्पेश याला आठ दिवसांपूर्वी लहान भाऊ मंथन याने चप्पलच्या व्यवसायाकरिता 1 लाख 40 हजार रुपये भांडवल दिले होते. त्यानंतर आठ दिवसांनंतर दिलेल्या भांडवलाचे काय केले असे मंथनने मोठा भाऊ कल्पेशला विचारले. यावर कल्पेशने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगितल्याने दोघांत हाणामारी झाली. यावेळी मंथनने मोठा भाऊ कल्पेशवर चाकूचे वार करून ठार केले.

COMMENTS