संगमनेर ः युवती व महिला यांना खुले व्यासपीठ मिळावे व त्या सक्षम व्हाव्या यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखा

संगमनेर ः युवती व महिला यांना खुले व्यासपीठ मिळावे व त्या सक्षम व्हाव्या यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन कार्यरत असून विविध उपक्रमामुळे महिलांच्या कल्पकतेला मोठा वाव मिळाला असून उद्योग व्यवसायासाठी संधी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे. यशोधन कार्यालय येथे शिलाई मशीन प्रशिक्षणार्थी महिलांना आज डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते प्रमाणपत्र व कीडचे वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्योती मालपाणी, शीलाताई करंजेकर, सुरभी मोरे, अमृता राऊत, यशोधन कार्यालयाचे मुख्याधिकार श्रीराम कुर्हे यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. आजच्या युगातील महिला धाडसी, कर्तृत्ववान, स्वावलंबी व सक्षम आहेत. त्यांना पुढे जाण्यासाठी आधार म्हणून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन ची स्थापना झाली आहे. यामुळे महिलांना व युवतींना मोठी व्यासपीठ मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या इंदिरा महोत्सवाने अनेक युती व महिलांना व्यवसायासाठी नवी प्रेरणा व करिअरची दिशा मिळाली आहे. त्यामुळे महिलांचे मोठे संघटन झाले असून त्याचा उपयोग त्यांना भविष्यात विविध उपक्रमांमध्ये, व्यवसायात होणार आहे. याप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 100 महिलांना आज डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते सर्टिफिकेट व सुयोग मशनरी यांच्या वतीने टेलरिंग किट भेट देण्यात आली.
COMMENTS