Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय स्पर्धेत एकलव्य तायक्वांदोच्या खेळाडूंचा डंका

सहा खेळाडूंनी सुवर्ण तर एका खेळाडूने पटकावले रौप्यपदक

अहमदनगर ः इंडिया तायक्वांदो आयोजित फायनल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन व फर्स्ट किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच नाशिक येथील मीनात

राजकीय संघर्षात कुसडगाव एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात 5 कोटींची कामे मंजूर ः आमदार मोनिका राजळे
भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण

अहमदनगर ः इंडिया तायक्वांदो आयोजित फायनल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन व फर्स्ट किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकलव्य तायक्वांदो अकॅडमी अहमदनगरच्या खेळाडूंनी 6 सुवर्ण व 1 रौप्य अशा एकूण सात पदकांची कमाई केली.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूमध्ये क्षितिज पिसाळ, कार्तिकी वंजारे, आरव मुनोत, आर्यन खाकाळ, आर्यन सैनी, केशव जांगिड यांचा समावेश असून, रौप्यपदक साईराज उगले या खेळाडूने पटकावले. तर श्रीनिवास शिंदे याने सहभाग नोंदवून उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.या सर्व खेळाडूंचे इंडिया तायक्वांदो चे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलम्पिक चे महासचिव-नामदेव शिरगावकर, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे महासचिव गफार पठाण, ज्योती मॅडम यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.  या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे, योगेश बिचीतकर, मंगेश आहेर, सचिन मरकड, व  मास्टर अल्ताफ खान यांचे मार्गदर्शन लाभले. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओबासे, उपाध्यक्ष घनश्याम सानप, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीपदादा सातपुते त्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

COMMENTS